आदीवासी शाळेच्या वस्तीगृहांवर 361 कॅमेरांची नजर...!

आदिवासी मुला-मुलींच्या शाळा वसतिगृहांवर
361 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘तिसरा डोळा’
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.6(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील पाच शासकीय आदिवासी आश्रम शाळा, पाच आदिवासी मुलांचे वसतिगृह आणि तीन आदिवासी मुलींचे वसतिगृहांवर लक्ष ठेवण्यासाठी 361 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे शाळा, वसतीगृहांवर प्रकल्प कार्यालयातील वॉर रुम मधुन लक्ष ठेवण्यात येणार आहे.
प्रकल्प कार्यालयातील सीसीटीव्ही वॉर रुममध्ये या 361 कॅमेरांच्या सहाय्याने शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांमधील कामकाजावर थेट प्रकल्प कार्यालयातून लक्ष ठेवण्यात येईल व घडामोडींवर देखरेख ठेवण्यात येईल. प्रकल्प अधिकारी स्वतः रोज सर्व शाळा व वासतिगृहाची या माध्यमातून पाहणी करतील. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांचे व्यवस्थापन व प्रशासन सुधारण्यास मदत होणार आहे.
आदिवासी विकास आयुक्त श्रीमती लीना बनसोड, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.5) ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा नियोजन समितीतून नाविन्यपूर्ण योजनेतून 1 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. जिल्ह्यातील व प्रकल्प क्षेत्रातील उर्वरीत शाळाही सीसीटीव्ही निगराणीत आणण्याचे नियोजन सुरु आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
लेखाधिकारी प्रवीण भालेराव, दामोदर भानुसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) भगवान गायकवाड, भागवत कदम, डॉ.उद्धव वायाळ, विनोद कुमार सांगळे, गजानन रत्नपारखी, कारभारी भोरपे, जितेंद्र दीक्षित व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते तर सर्व मुख्याध्यापक व गृहप्रमुख, गृहपाल, अधीक्षक, अधिक्षिका हे दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ उद्धव वायाळ व आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) विनोदकुमार सांगळे यांनी केले.
What's Your Reaction?






