एसडिपिआयचे रोशनगेटवर विरोध प्रदर्शन...!

एसडिपिआयचे रोशनगेटवर विरोध प्रदर्शन...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया(एसडिपिआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष एम.के.फैजी यांना ईडिने अटक केल्यानंतर देशभरातील कार्यकर्ते संतप्त झाले आहे. या अटकेचा निषेध करण्यासाठी व फैजी यांची सुटका करावी यासाठी देशव्यापी विरोध प्रदर्शन करण्यात आले. दुपारी रोशनगेट येथे प्रदेश सरचिटणीस सय्यद कलिम यांच्या नेतृत्वाखाली हे विरोध प्रदर्शन करण्यात आले. "फैजी आम्ही तुमच्या सोबत आहोत" असे पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सय्यद कलिम यांनी आरोप केला की फैजी है निर्दोष आहेत त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. केरलात वक्फ बीलाविरोधात लाखोंचा जनसमुदाय आंदोलनाला सहभागी झाला होता त्या आंदोलनाला टार्गेट करण्यासाठी व विरोधी पक्षाची मजबूत बाजू हा पक्ष रोखठोकपणे ठेवत असल्याने सरकारचा तिळपापड होत असल्याने कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप नसलेल्या नेत्यांवर कारवाई बदल्याच्या भावनेने केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस सय्यद कलिम, युसुफ पटेल, जिल्हाध्यक्ष साकी अहमद, शेख नदीम व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






