जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग महीलेचा मोबाईल हिसकावला, जागरूक युवकांनी मिळवून दिला मोबाईल
व्याकुळ दिव्यांग महिलेच्या चेह-यावर फुलले हास्य,
जागरूक युवकांमुळे मिळाला हिसकावलेला मोबाईल....
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली घटना....
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)
जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगत्वाचा निधी घेण्यासाठी आलेली महिला रिक्षाची वाट पाहत असताना चोरट्याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. तेव्हा व्याकुळ व एका पायाने पूर्ण आदू असलेली महिला टाहो फोडत रडत होती. यावेळी म्हशी चारणा-या वृद्ध व पत्रकाराने दोघा तरूणांना चोरट्याचा शोध घेण्यास प्रोत्साहन दिल्यावर या दोघा धाडसी तरूणांनी तिचा मोबाईल एका तासात परत मिळवून देताच धाय मोकलून रडणारी दिव्यांग महीलेच्या चेह-यावर आनंदाने हसू फुलले.
नेहरू बालोद्यानसमोरील शहर बस थांबा येथे अनिता पवार (23) रा.देवळाई ही बाबा पेट्रोल पंप येथे जाण्यासाठी बसलेली असता हर्षनगर येथील प्रेम या पोलीस रेकॉर्डवरील सराईत चोरट्याने तिच्या हातातील अॅड्रॉईड मोबाईल हिसकावून पळ काढला. झटापटीत अनिताने आपला दिव्यांग मासिकनिधी असलेली बॅग पक्की धरुन ठेवली.
अनिता ही इयत्ता 12 वी उत्तीर्ण असून तेथे उपस्थित नागरिकांनी तिच्या हिसकावून नेलेल्या मोबाईलवर कॉल केला असता तो बंद होता. या नंतर एक महिला पोलीस स्कूटीवर जात असताना नागरिकांनी त्यांना घटना क्रम सांगितला असता तिने तुम्ही निघा असे दटावत स्वत: निघून गेली.
यानंतर 112 वर कॉल करूनही प्रतिसाद मिळाला नाही.
दोघा तरूणांची तत्परता
दिव्यांग महिलेचा टाहो पाहून तेथून दुचाकीवर जाणारे अल्ताफ कुरेशी अनसार शेख यांनी म्हशी चारणा-याने दिलेल्या माहितीनुसार व पत्रकार सतीश अन्वेकर यांनी दिलेल्या हिंमतीनंतर हर्षनगर येथील सामाजिक कार्यकर्ते रवी चांदने यांच्या मदतीने चोरट्याने घरात लपवलेला अनिताचा मोबाईल तिच्या ताब्यात दिला. तेव्हा ही दिव्यांगा अत्यानंदीत झाली. नागरिकांनी तिला सुखरूप रिक्षात बसवून पाठवले. या कामी अरफात यानेही मोलाची मदत केली.
What's Your Reaction?