मुस्लिम बेग मेहतर समाजातील नागरीकांना विना विलंब विविध प्रमाणपत्रे वितरीत करण्याची मागणी

मुस्लिम बेग मेहतर समाजातील नागरीकांना विना विलंब विविध प्रमाणपत्रे वितरीत करण्याची मागणी
भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष अलीम बेग यांच्या नेतृत्वाखाली उपविभागिय अधिकारी यांना दिले निवेदन...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)
शहर व जिल्ह्यातील मुस्लिम मेहतर समाजातील नागरीकांना तात्काळ व विना विलंब विविध प्रमाणपत्रे वितरीत करावे या मागणिचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष अलीम बेग या़च्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे शहर व जिल्ह्यात समाजाची लोकसंख्या पाच हजार इतकी आहे. आमचा समाज शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक, आर्थिक व राजकिय मागास असल्याने युवकांमध्ये अज्ञान असल्याने विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी अडचणी येत आहे. सन 2008 पूर्वी आमचा मुस्लिम मेहतर बेग समाज शेड्युल कास्ट मध्ये मोडत होता परंतु 2008 नंतर तात्कालीन राज्य सरकारने आमच्या समाजाला शेड्युल कास्ट प्रवर्गातून काढून स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये परावर्तित केले तेव्हापासून आमच्या समाजातील नागरीकांना युवकांना व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी अनेक अडचण्यांना सामोरे जावे लागत आहे. तो सिलसिला आजपर्यंत सुरुच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी व युवकांनी आपल्या कार्यालयात अर्ज सादर केले आहे. जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहीवासी, नाॅन क्रीमीलियर, डोमासाईल प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र मुस्लिम मेहतर बेग समाज युथ फ्रंट संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एजाज बेग सलीम बेग व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






