चक्का जाम आंदोलन आणि बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा विराट करण्याचा निर्धार

चक्का जाम आंदोलन आणि बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा विराट करण्याचा निर्धार...
शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत निर्धार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) : विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा..? हे जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. ५ ते १२ जून दरम्यान विविध आंदोलन या अंतर्गत नियोजित असून ११ व १२ जून रोजी बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा आणि चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. हा बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा आणि चक्का जाम आंदोलन विराट करण्याचा निर्धार आज ९ जून रोजी शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शहरातील क्रांती चौक येथील मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालय येथे शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या झालेल्या पदाधिकारी बैठकीत करण्यात आला.
शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभागनिहाय बैठका घेऊन या जन आंदोलनाची माहिती जनसामान्यांना द्यावी. लोकांमध्ये जनजागृती करून चक्का जाम आंदोलन आणि बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चात विराट संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्याची सूचना महानगरमुख राजू वैद्य यांनी यावेळी केली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, चंद्रकांत गवई, संतोष खेंडके,शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, शहर संघटक सचिन तायडे,उपशहर प्रमुख प्रमोद ठेंगडे, राजेंद्र दानवे, गणेश लोखंडे, अजय चोपडे, अनिल लहाने, नितीन पवार, सुरेश गायके, संजय बापू पवार, राज निळ, दिनेश राजे भोसले, नाना जगताप, लक्ष्मण पिवळ, सचिन वाघ, संजय कोरडे, सोमीनाथ नवपुते, कृष्णा मेटे, मुकेश खिल्लारे, विभाग प्रमुख सचिन कापसे, सूर्यकांत सूर्यवंशी, गणेश वैष्णव, भरत ढवळे, संजय मनमाडकर, नंदू लबडे, विनोद सोनवणे, संतोष बारसे, गजानन शिंदे, बाबासाहेब मिसाळ, शाखाप्रमुख सुनील कडवे, किरण गणोरे, प्रशांत डिघुळे, संतोष लिंबेकर, कैलास तीवलकर, साईनाथ जाधव, राम केकान, संदीप शिंदे, विजयकुमार गावडे, मयूर तुपे पाटील, भीमराव चव्हाण, अरुण गव्हाड पाटील, कृष्णा रिठे, गिरीश चपळगावकर, युवासेना शहराधिकारी रामेश्वर कोरडे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, अंजना गवई, सुमित्रा हाळनोर, उपशहर संघटक कविता मठपती, रंजना कोलते, विजया पवार, लता शंखपाळ, मनीषा खरे, सुचिता आंबेकर, कमल पिंपरे,अनिता डोभाळे, मीना थोरवे, प्रतिभा राजपूत, पद्मा नलावडे, बबीता रणयेवले, विभाग संघटक सुनिता महाजन व युवतीसेना जिल्हा समन्वयक दिपाली पाटील बोरसे उपस्थित होते.
What's Your Reaction?






