विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला खरिपाच्या पेरणीचा अनुभव

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला खरिपाच्या पेरणीचा अनुभव
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) : शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात भेट देऊन स्वतः तिफन चालवत खरिपाच्या पेरणीचा अनुभव घेतला.
शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे अंबादास दानवे यांना शेतीची सखोल जाण आहे. सध्या पेरणीचा काळ सुरू असल्याने आणि शेतमातीत काम करण्याची ओढ असल्यामुळे त्यांनी दौऱ्यातून वेळ काढून थेट शेतात उतरून हातात तिफन घेतले. शेतात राबताना त्यांची शेतकरी म्हणून असलेली ओळख स्पष्टपणे जाणवली.
या अनुभवामुळे त्यांनी आपल्या बालपणातील आणि शेतीतील आठवणी ताज्या केल्या. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत असतानाच प्रत्यक्ष शेतीच्या कामात सहभागी होऊन त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला.
What's Your Reaction?






