जिल्हा परिषदेसमोर शिक्षक समितीचे धरणे आंदोलन...

जिल्हा परिषदेसमोर शिक्षक समितीचे धरणे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - जिल्हा परिTषद शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात व आता होत असलेल्या बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यात यावी, याकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समितीने दि 18 ऑगस्ट दु. 2 ते 5 या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणात आले. आंदोलन केल्याचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. व पुढील पंधरा दिवसात सर्व विषयास न्याय मिळाला नाही तर , शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .
या निवेदनात पात्र शिक्षकांना निवडश्रेणी व चटोपाध्याय श्रेणीचा लाभ देण्यात यावा , बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी , प्रत्येक शिक्षकांस त्यांच्या कार्यरत शाळेच्या ठिकाणी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात यावीत , संवर्ग 3 च्या सेवाजेष्ठता यादीमध्ये झालेल्या गोंधळामुळे बदली प्रक्रियेत अनियमितता झालेली आहे , ती दुर करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी , जिल्हाभरातील पदविधर शिक्षकांच्या विषय वाटपात फार मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे , ती अनियमितता दुर करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी , शिक्षण विस्तार अधिकारी , मुख्याध्यापक व पदविधर शिक्षक यांची पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी. प्रलंबित शालेय पोषण आहार मानधन तात्काळ वाटप करण्यात यावेत , थकीत शिक्षकांची देयके व वैद्यकिय बिले तात्काळ निकाली काढावेत , सेवापुस्तिका पडताळणी तात्काळ करण्यासंदर्भात प्रत्येक गटशिक्षणाधिकारी कार्यालयास आदेशित करावे. यासह विविध प्रलंबित विषय तात्काळ निकाली काढण्यात यावीत अशी मागणी केलेली आहे.
या आंदोलनास शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, नितीन नवले, शामभाऊ राजपुत, कडुबा साळवे , के.डी. मगर, विष्णु भंडारे, पंडीत भोसले ,रऊफ पठाण, जावेद अन्सारी, सतिश कोळी, मंगला मदने, वैशाली इंगळे, शितल भडांगे, दिपीका एरंडे, जयश्री राठोड, अर्चना गोर्डे, दिपीका पाटील, सुनिता चितळकर, संगीता मते, वर्षा राठोड, कल्पना नाईक, संगीता मते, अशोक डोळस, बबन चव्हाण, टि के पुनवटकर , नामदेव पवार , रमेश पांचाळ ,विलास चव्हाण, राजाभाऊ राठोड , बाळु आढे, गजानन वरकड , दिलीप जाधव , प्रविण गायकवाड, कैलास ढेपले, दत्ता खाडे, अंकुश वाहुळ ,मिलीद सिरसाट , साईनाथ रवले , पंजाबराव देशमुख, विजय पवार, बाळु आढे, दिलीप जाधव , मोतीलाल पवार, शिवाजी भोसले, रामनाथ शेळके , रामेश्वर रोडे , दिलीप आढे , शांतीलाल राठोड, शहादेव सोनवणे , संजय घोगरे , अन्वर शेख , धनराज सुरडकर , यादी सह शेकडो शिक्षकांनी उपस्थित होते. या आंदोलनास , शिक्षक भारती संघटनेचे संतोष ताठे , महेंद्र बार बाळा , जुनी पेंशन हक्क संघटनेचे गोविंद उगले , भिमराव मुंडे , दिव्यांग शिक्षक संघटनेचे विजय शेळके , केंद्रप्रमुख संघटनेचे पंडीत भोसले, सेवानिवृत्त संघटनेचे विठ्ठल जाधव, रामू गायकवाड, राजेंद्र वाघमारे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठींबा दर्शविला.
What's Your Reaction?






