तलाठी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन
तलाठी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज)
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दौऱ्यावर आले असता विमानतळावर हिंगोली जिल्ह्यातील तलाठी बांधव कै. संतोष पवार हत्या प्रकरणात त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य सांगून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, अनुकंपाद्वारे वारसास सेवेत सामावून घ्यावे, शासनातर्फे 50 लाख आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी कलम 353 नॉन बेलेबल करावे व आणखी सक्त कायदे करून शासकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढवावी याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. महोदयांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे कार्यवाहीचे आश्वासन दिले. यावेळी गृहमंत्री येण्यापूर्वी पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब, मंत्री अतुल सावे, आमदार श्री प्रशांतजी बंब व इतर वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. अशी माहिती डि-24 न्यूजला तलाठी संघटनेचे अध्यक्ष अनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे.
What's Your Reaction?