दिल्लीगेटवर अतिक्रमण काढताना टेंशन, तणाव, संताप, पोलिसांची कुमक वाढवून केली कार्यवाई...

 0
दिल्लीगेटवर अतिक्रमण काढताना टेंशन, तणाव, संताप, पोलिसांची कुमक वाढवून केली कार्यवाई...

दिल्लीगेटवर अतिक्रमण काढताना करावी लागली कसरत, पोलिस कुमक वाढवून काढले अतिक्रमण

तीन तास अतिक्रमण कार्यवाही थांबवावी लागली, काही काळ तणाव, एकाने उचलले दगड, अतिक्रमण काढताना मनपा प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप, बारबेरीयन हेल्थ क्लब वर प्रशासन मेहरबानी, बाचाबाची, संतापाचे वातावरण, तीन शेळ्यांचे प्राण वाचले, पोलिसांनी जमावाला पांगवले, भुसंपादन नाही तरीही अतिक्रमणाच्या नावावर मालमत्ता घेत असल्याचा आरोप...राष्ट्रवादीचे नेते इलियास किरमानी मैदानात, बारबेरीयन जीमकडून दहा लाख वसूल...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)

सोमवारी सकाळपासून दिल्लीगेट पासून हर्सुल टि पाॅईंटवरील अतिक्रमण काढताना टेंशन बघायला मिळाले. तणाव, बाचाबाची, संताप रस्त्यावर बघायला मिळाला. दिल्लीगेटवर तीन तास कार्यवाही थांबवावी लागली. पोलिसांची अधिक कुमक मागवून पुढील कार्यवाई मनपा प्रशासनाने सुरु करुन संध्याकाळपर्यंत 245 अतिक्रमणे काढण्यात आली. आमच्या प्रतिनिधीने मनपा उपायुक्त तथा अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळ यांना प्रश्न विचारले की ज्या रस्त्यावर बाधित मालमत्ता काढली जात आहे अतिरिक्त जागेवरील अतिक्रमण काढले जात आहे मालमत्तेचे भुसंपादन झाले आहे का...? मालमत्ताधारकांना मोबदला दिला आहे का...? याला उत्तर देताना त्यांनी सांगितले बांधकाम परवानगी नसल्याने व गुंठेवारी नसल्याने हि अतिक्रमण काढले जात आहे. अगोदर हा रस्ता 30 मीटर होता नंतर 35 मीटर करण्यात आला असल्याने सर्व्हिस रोड मोकळा केला जात आहे. प्रशासन कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. हि कार्यवाही सुरुच राहणार आहे. नागरीकांना आपल्या मालमत्तेची गुंठेवारी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

महापालिकेचे 350 अधिकारी व कर्मचारी तर पोलिस विभागाचे 250 अधिकारी कर्मचारी यांचा समावेश होता. हाॅटेल, दुकाने, शेड, कंपाऊंड, शेड, गॅरेज, कमान, जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले. 15 जेसीबी, 4 पोकलेन, 15 टिप्पर, 2 रुग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 5 इलेक्ट्रीक हायड्रोलीक वाहनांचा समावेश होता.

पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, बेगमपुरा पोलिस निरीक्षक जगताप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती. मनपाचे नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता(यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, सहायक आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, अशोक गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहुल जाधव, नईम अन्सारी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सय्यद जमशेद, सय्यद मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सुरज सवंडकर, राहुल मालखेडे, शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते.

दिल्लीगेट वर कसा वाढला तणाव...

महाविर ट्राव्हल्सचे अतिक्रमण न काढता बुलडोझर पुढे सरकला तर दोनदा बारबेरीयन जीमवर बुलडोझर जावून अतिक्रमण न काढता परतले यामुळे तेथील मालमत्ताधारक संतापले. ते अतिक्रमण न काढता आमचे का काढत असल्याचा आरोप करत लोक संतापले. ज्युस सेंटरचे अतिक्रमण काढताना अधिक तणाव वाढला. रागाच्या भरात जमावात एकाने कर्मचा-यांवर दगड उचलले. उपायुक्त संतोष वाहुळ संतापले. पोलिसांना पाचारण करत तेथील अतिक्रमण भुईसपाट केले. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले. महावीर ट्राव्हल्सच्या बाजूचे टिन शेड काढताना मालमत्ताधारकाचा राग अनावर झाला. मार्कींग केली नाही, नोटीस दिली नाही आत्ताच बांधकाम परवानगी द्या. मनपा प्रशासन मनमानी करत आहे. गुन्हा दाखल करुन तुरुंगात पाठवण्याची धमकी अधिकारी देत आहे. न्यायालयाचे आदेश दाखवा असा प्रश्न उपस्थित केला. अगोदर 30 मिटर रस्ता होता आता 35 मीटर करुन दोन्ही बाजूने अडीच मिटर बाधित मालमत्तांचे अतिक्रमण काढताना टेंशन बघायला मिळाले. दिल्लीगेटच्या डाव्या बाजूला अतिक्रमण काढताना मालमत्ता धारकांच्या सतर्कतेने तीन शेळ्यांचा जीव वाचला. भिंती खाली दबून त्या मेल्या असत्या. बारबेरियन पाॅवर जीमवर मनपा प्रशासकांनी मेहरबानी दाखवत गुंठेवारी मध्ये नियमित करण्यासाठी त्यांची इमारत वाचवली. दहा लाखांचा धनादेश घेवून मालमत्ता नियमित करण्यात आली. या प्रकारामुळे इतर मालमत्ताधारकांमध्ये संताप पाहायला मिळाला. अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याचे धोरण असतानाही बारबेरियन पाॅवर जीमला वेगळा न्याय का दाखवण्यात आला...? प्रशासक जी श्रीकांत हे व्यायाम करण्यासाठी येथे येतात म्हणून मेहरबानी केली का... असा सवाल सर्व सामान्य नागरीकांकडून केला जात आहे. 30 मीटरला परवानगी असताना मात्र संरक्षण भिंती साठी परवानगी घेण्यात आली नाही. गेट संरक्षण भिंत तोडण्यात आल्या. घराची बांधकाम परवानगी असताना माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते इलियास किरमानी संतापले. उपायुक्त संतोष वाहुळ यांना कागदपत्रे दाखवली तरीही गेट आणि संरक्षण भिंत तोडण्यात आली. उद्या हर्सुल टि पाॅईंट ते सिडको बस स्टॅण्ड पर्यंत अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती संतोष वाहुळ यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow