शहरात मोहर्रमनिमित्त सवारीया व मातमी जुलूस, शिया-सुन्नी सोबत येण्याची 53 वर्षांपासून परंपरा कायम...

शहरात मोहर्रमनिमित्त सवारीया व मातमी जुलूस, शिया-सुन्नी सोबत येण्याची 53 वर्षांपासून परंपरा कायम...जूलूसमध्ये तिरंगे झेंडे...
शिक्षणात पुढे या, नशेपासून दूर राहा - पोलिस आयुक्त प्रविण पवार...यौमे आशुरा निमित्त मातमी जुलूस...149 सवारिया सिटीचौकात...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)-
मोहर्रम यौमे आशुरा निमित्त मागिल 53 वर्षांपासून शिया आणि सुन्नी मुस्लिम सोबत येण्याची जगातील पहेले उदाहरण कायम आहे. भाईचारा, संघर्ष व हक्कासाठी लढण्याचा संदेश हा सण देतो. मोहर्रम निमित्त सिटी चौक येथील कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती प्रविण पवार यांनी सवारिया व मातमी जुलूसचे स्वागत केले. आलमबरदार कमेटीच्या वतीने अध्यक्ष माजी महापौर रशीद मामू यांनी पोलिस आयुक्त व पोलिस अधिका-यांचे फेटे बांधून स्वागत केले. अंजूमन-ए -खादीमुल मासुमीनचे अध्यक्ष एजाज झैदी, शिया धर्मगुरु मोहंमद अब्बास साबरी, परवेझ जाफरी, मुशीर हुसेन यांचे अलमबरदार कमेटीने मातमी जुलुसचे स्वागत केले. याप्रसंगी अफसरखान, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलिस उपायुक्त सुनील माने, सहायक पोलिस आयुक्त संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांची उपस्थिती होती.
नशेपासून दूर राहा, शिक्षणात पुढे यावे - पोलिस आयुक्त प्रविण पवार
समाजातून वाईट प्रवृत्तीला दूर करा. नशे पासून युवकांनी दुर राहुन शिक्षणात पुढे यावे. युवक ड्रग्सच्या आहारी जात आहे. शहरात हजारो कोटींची गुंतवणूक येत आहे यामुळे हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आषाढी एकादशी व मोहर्रम हे दोन्ही सन एकच दिवशी आले असल्याने शांततेत पार पडले आहे. आलमबरदार कमेटीचे मी कौतूक करतो या निमित्ताने शिया व सुन्नी समाजाला एकत्र आणण्याचे काम केले याबद्दल रशीद मामू व त्यांचे टिमचे स्वागत केले.
149 सवा-यांचे आगमन व स्वागत
सिटी चौक येथे दरवर्षीप्रमाणे 149 सवा-यांचे आगमन होते. पोलिस प्रशासनाच्या वतीने पुष्पमाला घालून स्वागत केले जाते. आलमबरदार कमीटीचे अध्यक्ष रशीद खान मामू यांच्याकडून व्यासपीठ उभारुन जनसमुदायाला संबोधित केले. यावर्षी मोहर्रम शांततेत संपन्न झाले याबद्दल रशीद खान मामू व अफसरखान यांनी पोलिस विभागाचे आभार मानले.
यौमे आशुरानिमित्त मातमी जुलूस...
दरवर्षीप्रमाणे शिया समुदायाच्या वतीने शहीद इमाम हुसेन हसन यांची आठवण म्हणून काळे कपडे परिधान करुन मातम केले जाते. अंजूमन ए खादीमुल मासुमीनच्या वतीने अध्यक्ष एजाज झैदी यांच्या मार्गदर्शनाखाली 70 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन शहरात केले जाते. आज मातमी जुलूस फाजलपुरी येथील दिवंगत मोहंमद नवाब यांच्या निवासस्थानापासून सकाळी 8 वाजता निघाले. हा जुलूस फाजलपुरा, शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटी चौक, हेड पोस्ट ऑफीस येथून परत बुढीलेन, झैदी लेन, देवडी बाजार येथून परत सिटी चौक, गुलमंडी, बारा भाई ताजीया येथून आशुरखाना सालारजंग येथे समापन झाले. यावेळी हजारो शिया बांधव उपस्थित होते.
What's Your Reaction?






