प्रदीप जैस्वाल यांनी गोकुळनगरमध्ये रस्त्याच्या कामाचे केले भुमापुजन

 0
प्रदीप जैस्वाल यांनी गोकुळनगरमध्ये रस्त्याच्या कामाचे केले भुमापुजन

गोकुळनगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) मध्य विधानसभा मतदार संघातील वॉर्ड क्र.8 सुरेवाडी येथील गोकुळनगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले.

 नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनंतर हे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले असून, या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना पावसाळ्यातील चिखलट मार्ग, धुळीची समस्या व अपघाताच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत इंगळे, उपशहरप्रमुख रमेश सूर्यवंशी, रामदास पवार, काशिनाथ बकले, मा.नगरसेवक गंगाधर ढगे, संतोष सुरे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.संगिता बोरसे, विभागप्रमुख नितीन कळसकर, संजय नवले, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर शिरसाट, नागेश हिवाळे, विकी लोखंडे, मनोज हनवंते, रामदास हरणे, सौ.देशपांडे ताई, रुपाली हिवाळे, कविता फरकाडे, शकुंतला महाडिक, सुनिता शेवाळे, तसेच मधुकर खंबाट, सावेश जाधव, सचिन जैस्वाल, शैलेश जैस्वाल, रघुनंदन जैस्वाल, अविनाश गारदे, किरण पवार, अमोल भुतकर, राम मोरे, अतुल राकडे, संजय खरात, शरद राणा, हिरालाल नागलोत, पुनम गायकवाड, बाहेती, गणेश जैस्वाल, सौ.खंबाट, सौ.बढे, सौ.ठाले, सौ.नागलोत, सौ.खरात, सौ.सुरडकर, सौ.दिपाताई जाधव, सोनवणे, रामकोर आदिंसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, महिला तसेच नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow