शहरात इराणचे सुप्रीम लिडर अयतुल्लाह खामेनई यांचे पोस्टर झळकले, शिया समुदायाने केला खुलासा

शहरात इराणचे सुप्रीम लिडर अयतुल्लाह खामेनई यांचे पोस्टर झळकले, शिया समुदायाने केला खुलासा...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)-
इजराईल व इराणच्या युद्धानंतर जगासमोर इराणचे सुप्रीम लिडर अयतुल्लाह खामेनई प्रकाशझोतात आले. 79 वर्षाचे वय असलेले खोमनई यांची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांना शिया समुदाय आपले धर्मगुरु मानतात. म्हणून शहरात मोहर्रम निमित्ताने सिटीचौक परिसरात त्यांचे बॅनर शिया समुदायाने लावल्याने राजकीय क्षेत्रात वाद निर्माण होण्याची शक्यता होती. काही माध्यमांनी हे पोस्टर लावण्याचा भारतात काय उद्देश याबद्दल प्रश्न उपस्थित केले. यामुळे वाद होण्याची चिन्हे होती. याचा खुलासा करण्यासाठी शिया समुदायाचे ऑल इंडिया शिया पर्सनल लाॅ बोर्डाचे सदस्य एजाज झैदी व डाॅ. दिलशाद झैदी यांनी सांगितले हे बॅनर पोस्टर दरवर्षी मोहर्रम निमित्ताने लागतात. आम्ही अगोदर भारतीय आहोत. अयतुल्लाह खामेनई हे इराणचे सुप्रीम लिडर असले तरी ते शिया धर्माचे धर्मगुरु पण आहेत. त्यांना आम्ही मौलाना म्हणतो. सुप्रीम लिडर म्हणून त्यांचे हे फोटो लावले नाही तर धर्मगुरु म्हणून लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगोदर त्यांच्या पूर्वजांचे पण फोटो लावले जात होते. खामेनई यांचे फोटो इराणचे सुप्रीम लिडर म्हणून नाही तर धर्मगुरु म्हणून लावले जातात. इमाम हुसेन हसन यांनी त्याकाळी कशाप्रकारे जंगमध्ये शत्रुचा मुकाबला केला तो संदेश बॅनरवर दिला गेला आहे. भारतीय राज्यघटनेने आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. धर्माच्या प्रचार प्रसाराचा आम्हाला अधिकार आहे. मोहर्रम महीन्यात आम्ही शहीद झालेले इमाम हुसेन हसन यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दु:खात मातम करण्यात येते. खामेनई धर्मगुरु पण असल्याने त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्यासाठी हा संदेश देण्यात आला आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतु नाही. इज्राईल व इराणच्या युद्धामुळे सर्वांच्या नजरा या बॅनरकडे गेले ती दरवर्षी लावली जातात यामध्ये गैरसमज करुन घेवू नये आमचा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी काही देणे घेणे नाही असा खुलासा त्यांनी या बॅनरवरुन केला आहे.
What's Your Reaction?






