रोजाबाग इदगाहमध्ये सुशोभीकरणाला सुरुवात...!
रोजाबाग इदगाहमध्ये सुशोभीकरणाला सुरुवात
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) शहरातील रोजाबाग इदगाहमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन करत सुशोभीकरणाचे काम सुरू केल्याने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण आहे. औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या स्वेच्छा निधीतून इदगाहच्या विकासासाठी एक कोटी रुपये निधीचे कामाचे उद्घाटन आज दुपारी करण्यात आले. ईदगाह कमेटीने आमदार जैस्वाल यांचे आभार मानत स्थानिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी इदगाह कमेटीचे अध्यक्ष सलिम पटेल व फैसल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.
सुशोभीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, परिसरात गट्टू, मैदानास संरक्षित भिंत, विद्यूत लाईट बसवले जातील असे डि-24 न्यूजला जैस्वाल यांनी सांगितले. त्यांनी सांगितले इदगाह कमेटीच्या वतीने विकासकामे करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. भविष्यात आणखी विकासकामे येथे केली जातील. ईदच्या नमाजसाठी लोक येथे येतात त्यांना येथे चांगली सुविधा उपलब्ध झाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
याप्रसंगी ईदगाह कमेटीचे अध्यक्ष सलिम पटेल, फैसल पटेल ,विश्वनाथ राजपूत, मुश्ताक सर, कय्यूम खान, रमेश सुर्यवंशी , रामदास पवार, शिवाजी सिरसाट, जेष्ठ पत्रकार शेख मजहर, मोईन लकी, शेख नाजिम, मनपाचे अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?