वकीलांचा पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा, आयुक्तांना दिले निवेदन...!
वकीलांचा पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा, आयुक्तांना दिले निवेदन...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) जिल्हा वकील संघाचे सभासद अॅड सिध्दार्थ काशिनाथ बनसोडे व अॅड किशोर उत्तमदास वैष्णव यांना सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी बेकायदेशीर रित्या ताब्यात घेऊन चुकीचा गुन्हा नोंदवून त्यांची समाजामध्ये जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली. अशा घटनेचा जिल्हा वकील संघाने जिल्हा व सत्र न्यायालय येथे पेनडाऊन आंदोलन करुन जिल्हा व सत्र न्यायालय ते पोलिस आयुक्त कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढून सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना निलंबित करण्याची मागणीचे निवेदन आज पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना देण्यात आले. त्यांनी निवेदन स्विकारत पोलिस निरीक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड मिलिंद पाटील, सचिव अॅड तिर्थराज चावरे, उपाध्यक्ष अॅड सुनील पडूळ, उपाध्यक्ष अॅड सुवर्णा डोणगावकर, सहसचिव अॅड करण गायकवाड, सदस्य अॅड राहुल भगत, अॅड संदीप कोल्हे, अॅड आशिष कोलते, अॅड कैलास जाधव, अॅड राहुल जमधडे, अॅड नवाब पटेल, अॅड ममता झाल्टे तसेच महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड व्हि.डी.साळुंखे तसेच वकिल संघाचे विविज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चासाठी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील सर्व तालूका वकील संघ पैठण, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला
.
What's Your Reaction?