संसारनगर, समतानगर आणि कोटला काॅलनी येथे प्रदीप जैस्वाल यांची भव्य पदयात्रा
 
                                संसारनगर, समतानगर आणि कोटला कॉलनी येथे प्रदीप जैस्वाल यांची भव्य पदयात्रा
विकास कामांची दिली माहिती, उर्वरित कामे देखील येत्या काळात मार्गी लागणार
शेकडो भीमसैनिकांची पदयात्रेला उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी आज त्यांच्या प्रचारार्थ संसारनगर, समतानगर आणि कोटला कॉलनी येथे भव्य पदयात्रा काढली. यादरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत झालेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच येत्या काळात निवडून आल्यावर आपले सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन प्रदीप जैस्वाल यांनी यावेळी केले.
या पदयात्रेदरम्यान परिसरातील नागरिकांनी भव्य रांगोळ्या काढत प्रदीप जैस्वाल यांचे स्वागत केले, तसेच फटाके फोडून औक्षण करत त्यांना विजयी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. संसारनगर, कोटला कॉलनी भागात महायुती सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहे. परिसरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आलेले आहेत. तसेच विविध विकास कामे या परिसरात झालेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक प्रदीप जैस्वाल यांच्या कामावर आनंदी आहेत. नागरिकांनी यावेळी प्रदीप जैस्वाल यांना आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्याची विनंती केली. तसेच झालेल्या कामांबद्दल त्यांचे आभार मानत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी खा.डॉ.भागवत कराड, शिरीष बोराळकर, बाबुराव कदम, मेनन साहेब, अभिजीत देशमुख, हर्षवर्धन कराड, नागराज गायकवाड, विश्वनाथ राजपुत, ऍड.विजय जोंधळे, राहुल रोजतकर, जालिंदर शेंडगे, कय्युम शेख, किशोर थोरात, बंटी मगरे, नंदू वाकेकर, युवराज वाकेकर, चिंतन शहा, धीरज पवार, गोपी घोडेले यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            