दर्पण दिनानिमित्त पत्रकार आरेफ देशमुख यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले सन्मानित

दर्पण दिनानिमित्त पत्रकार आरेफ देशमुख यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले सन्मानित
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) दर्पण दिन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकारांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल स्मृती चिन्ह देऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विभागीय अधिस्वीकृती समीतीचे अध्यक्ष डॉ.माधव सावरगावे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, तहसीलदार रमेश मुनलोड, माहिती अधिकारी डॉ.मीरा ढास, सहाय्यक संचालक गणेश फुंदे यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






