रोशन गेट परिसरात काँग्रेसने घेतला आधार अपडेट कॅम्प...

 0
रोशन गेट परिसरात काँग्रेसने घेतला आधार अपडेट कॅम्प...

रोशन गेट परिसरात काँग्रेसने घेतला आधार अपडेट कॅम्प...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - रोशन गेट परिसरात काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. सरताज पठाण यांनी मोफत नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार अपडेट व सुकन्या समृध्दी योजना व चालू बँक खाते हेड पोस्ट ऑफीसच्या सहकार्याने कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पचे उद्घाटन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. 

यावेळी शेकडो लाभार्थ्यांनी कॅम्पचा लाभ घेतला. प्रमुख उपस्थिती शहर काँग्रेस महीला आघाडीच्या अध्यक्षा दिपाली मिसाळ, राज्य प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे, कैसर बाबा, ताबिश कादरी, शेख अकील, मेराज पठाण, मोहंमद जाकीर उपस्थित होते.

कॅम्प यशस्वी करण्यासाठी हेड पोस्ट ऑफीसचे विपनन अधिकारी सहदेव सातपुते, अशोक जाधव, सुनीता बागूल, प्रियंका गाडेकर, करण नारकर, प्राजक्ता ताठे, स्नेहल वंजारे, राहुल लोमटे, गजानन ठाकूर, डि.एन.साळुंके यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow