कटकट गेट नाल्यावरील अतिक्रमण काढून चौकाचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण
कटकट गेट नाल्यालगतची अतिक्रमणे काढण्याचे आदेश...
प्रशासकांची पाहणी : सुभोभीकरणासाठी एक कोटींचा निधी
रस्ता वर खाली झाल्याने त्याच्यावर गट्टूचे रैम्प बसवले जातील...प्रशासकांनी आढावा घेत दिले आदेश
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मंगळवारी कटकट गेट परिसरात पाहणी केली. यावेळी कटकट गेट नाल्यावर व नाल्यापासून काही अंतरावर असलेल्या पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमणे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तातडीने ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश त्यांनी अधिकार्यांना दिले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रम व उपक्रमाअंतर्गत पालिकेला शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण कामांसाठी तब्बल 40 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून तीस प्रकारची विविध कामे करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. याच अनुषंगाने पालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता कटकट गेट परिसरात पाहणी केली. एक कोटींतून कटकट गेटचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या कामाची दोन दिवसांपूर्वीच निविदा काढली आहे. पाहणीदरम्यान, या कामात नाल्याचा परिसर स्वच्छ करा, चौकात हायमास्ट लावा, नाल्याच्या कडेला सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याची सूचना त्यांनी केली. येथे लागूनच पालिकेची मोकळी जागा आहे. मात्र या जागेवर वाळूसह इतर साहित्य टाकून अतिक्रमण केलेले आहे. कटकट गेट व नाल्यालगत देखील अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आले. त्यावर जी. श्रीकांत यांनी तातडीने सर्व अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. यावेळी शहर अभियंता ए.बी. देशमख, वॉर्ड अधिकारी नईम अन्सारी, पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, जनसंपर्क अधिकरी तौसिफ अहेमद यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?