एमआयएमच्या वतीने जनता दरबार सुरू, पहिल्याच दिवशी शंभरहून जास्त तक्रार दाखल

 0
एमआयएमच्या वतीने जनता दरबार सुरू, पहिल्याच दिवशी शंभरहून जास्त तक्रार दाखल

एमआयएमच्या वतीने जनता दरबार सुरू, शंभरहून जास्त तक्रार दाखल

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) शहर व जिल्ह्यातील समस्या व तक्रारी शासकीय स्तरावर प्रशासनाशी संपर्क करुन नागरिकांच्या नागरी समस्यांचा पाठपुरावा करुन सोडवण्यासाठी एम आय एमच्या वतीने जनता दरबार सुरू करण्यात आला आहे. बुढीलेन येथील दारुस्सलाम येथे पहिल्याच दिवशी शंभरहून तक्रारी दाखल झाले असल्याची माहिती डि-24 न्यूजला जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान यांनी दिले आहे. हा जनता दरबार सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन एमआयएमच्या वतीने करण्यात आले आहे.

जनता दरबारात स्वतः जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, युवक जिल्हाध्यक्ष मुन्शी पटेल उपस्थित राहुन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. पदाधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहण्याचे पक्षाच्या वतीने आदेश दिले आहेत. 

या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

संबंधित विभागाशी संपर्क करुन समस्या सोडवले जाणार आहे. यावेळी दूध व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख साबेर, औरंगाबाद मध्य विधानसभेचे अध्यक्ष भाई इम्तियाज, पश्चिम विधानसभा अध्यक्ष शोएब खान, सोशलमिडीया अध्यक्ष अनिस पटेल, परवेझ खान, कलिम खान, अनिस खान, अजहर पठाण, अतिख खान, रफीक पटेल, कलिम शेख, शकील पटेल, शेख शोएब, इर्शाद शेख, मतीन खान, मोबीन शेख आदी पदाधिकारी तक्रार घेण्यासाठी दारुस्सलाम येथे उपस्थित राहणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow