स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी दिला गीतेचा संदेश

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी
दिला गीतेचा संदेश
बेगमपुरा भागातील ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज):
शहरातील बेगमपुरा भागात असलेल्या ज्ञानेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ' निष्काम कर्मयोग आणि प्रेम' या संदर्भात गीतेतील संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कृष्णलीला सादर करण्यात आली.
शहरातील बेगमपुरा भागातील ज्ञानेश्वर विद्यालयाने संत एकनाथ रंग मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय सिसोदे, सहसचिव श्रीमंत सिसोदे, सचिव यशोद सिसोदे, कोषाध्यक्ष तुषार शिसोदे, प्रभाकर मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत मराठी माध्यमातील विद्यार्थी देखील कोणत्याही स्थितीत कमी पडत नाहीत, मागे राहत नाहीत, हे यातून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. शाळेतील शिक्षकांनी योग्य संस्कार केल्यामुळे हे विद्यार्थी निश्चितपणे समाजात आपला ठसा, उमटवतील असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. श्रीकृष्ण अवताराचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण लीलाच्या माध्यमातून केला. त्यातून गीतेतील उपदेश देखील पोहोचवला. गीतेचा उपदेश समाज पर्यंत पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता, असे यासंदर्भात मुख्याध्यापिका संध्या मोरे यांनी सांगितले. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती राठोड यांनी सूत्रसंचालन केले. श्री. भडके यांनी आभार मानले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले. कार्यक्रमाला पालकांची विशेष उपस्थिती होती.
What's Your Reaction?






