उघड्यावर कचरा टाकणा-यांवर अत्याधुनिक कॅमेराची नजर, ट्रॅक्टरचालकाला भरावा लागला 5 हजार दंड

 0
उघड्यावर कचरा टाकणा-यांवर अत्याधुनिक कॅमेराची नजर, ट्रॅक्टरचालकाला भरावा लागला 5 हजार दंड

उघड्यावर कचरा टाकणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई...

कमांड कंट्रोल रूमची निगराणी...

अत्याधुनिक कॅमेऱ्यांची शहरावर नजर..‌.

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) जिल्हा परिषदेच्या मैदानावर कचरा फेकणाऱ्या ट्रॅक्टर वर घनकचरा विभगाच्या वतीने आज कारवाई करण्यात आली.

स्मार्ट सिटी कार्यालयात कमांड कंट्रोल रूम द्वारे शहरात निगराणी करणाऱ्या कॅमेऱ्यात जिल्हा परिषदेच्या मैदानात एक ट्रॅक्टर चालक कचरा फेकत असल्याचं दिसून आले, नागरी मित्र पथकाला याची सूचना मिळाल्यावर नागरी पथका द्वारे गाडी पकडून त्या चालकावर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरात अनेक भागात स्मार्ट सिटी अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसविण्यात आले आहे. कमांड कंट्रोल रूम द्वारे शहरात कॅमेरा मधून 

निगराणी करण्यात येत आहे. बुधवारी दुपारी सुमारास जिल्हा परिषदेच्या मैदाना वर एक ट्रॅक्टर उघड्यावर गाडी भर कचरा टाकत असल्याचं दिसून आले ,घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सोमनाथ जाधव यांनी त्वरित झोन अधिकारी रमेश मोरे आणि नागरी पथक प्रमुख याना घटना स्थळी जाण्याचे सांगितले ,पथकातील कर्मचारी देविदास सुसर यांनी झेडपी मैदानावर जाऊन तत्काळ गाडी पकडून ती चालका सह मनपा कार्यालयात आणले, मनपा उपायुक्त तथा घनकचरा प्रमुख सोमनाथ जाधव यांनी या चालका विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले ,या प्रमाणे नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांनी त्या चालकाला पाच हजार रुपये दंड आकारला आणि या पुढे असे करू नका अन्यथा मोठी कारवाई करण्याचे समज दिली.

महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेश नुसार शहरात मोठ्या प्रमाणात कचरा व्यवस्थापन वर नियोजनब्द्ध उपक्रम राबविण्यात येत असल्याने कचऱ्याची समस्या सोडविण्यात प्रशासनास यश आले आहे .कचरा वर्गीकरणात घनकचरा प्रकल्प प्रमुख तथा उप आयुक्त सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शन नुसार झोन निहाय वर्गीकरण कचरा गोळा करण्यात येत आहे ,या मुळे बहुतांश शहरात कचरा समस्या सोडविण्यात प्रशासन यशस्वी होताना दिसत आहे ,परंतु काही नागरिक आज ही बिनधास्त रस्त्यावर व उघड्यावर कचरा फेकत आहे ,या वर ही घनकचरा विभाग लक्ष देऊन आहेत ,अशा नागरिकावर कारवाई करण्यासाठी नागरी मित्र पथक कारवाई साठी सज्ज आहे. सदर कारवाई मनपा उपायुक्त तथा घनकचरा प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या आदेशानुसार, झोन वॉर्ड अधिकारी रमेश मोरे ,नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, देविदास सूसर यांनी केली.

आता स्मार्ट सिटी कार्यालयातील कमांड कंट्रोल रूम मधील कॅमेरा द्वारे अशा प्रकारच्या कचरा फेकणाऱ्यां वर आपल्या तिसऱ्या डोळ्यातून नजर ठेवणार आहे ,या मुळे अशा लोकांनी खबरदार रहावे अन्यथा तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow