अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, लाडकी बहीण योजनेचे कामाला विरोध
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, लाडकी बहीण योजनेचे कामाला विरोध
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.8(डि-24 न्यूज) राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात गर्दी होत आहे. त्यांची कागदपत्रे गोळा करणे, नोंदणी करणे इत्यादी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करण्यास सांगितले आहे. आयएसडीएस प्रकल्पाची अनेक कामे असताना हि अतिरिक्त कामे देणे योग्य नाही असे आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनचे मत आहे. या कर्मचाऱ्यांना आयसीडीएस अतिरिक्त कुठलीही कामे देऊ नयेत असे निर्देश यापूर्वी केंद्र व महाराष्ट्र शासनाने तसेच न्यायालयानेही दिलेले आहे. तरीही हि कामे देण्यात येतात याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, आयटकने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे लाडकी बहीण योजनेचे कामाची अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सक्ती करु नये, आयसीडीएस व्यक्ती रिक्त कुठलीही कामे भविष्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नये. लोकसभा निवडणुकी दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून किमान वेतनापर्यंत देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्यात यावी. पात्र मदतनीसांना तातडीने सेविकांच्या रिक्त जागेवर नियुक्ती देण्यात यावी. सेविका पदावर बढती मिळालेल्या व सेविकेची कामे आपल्या आदेशानुसार सुरू केलेल्या सर्वांना सेविकेचे मानधन देण्यात यावे व थकबाकी अदा करावी. सुपरवायझर व कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होणारा त्रास थांबवण्यात यावा. थकीत प्रवास भत्ता त्वरित देण्यात यावी. या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी काॅ.प्रा.राम बाहेती, काॅ.तारा बनसोडे, काॅ.अनिल जावळे, काॅ.शालिनी पगारे, काॅ.मीरा अडसरे, काॅ.उषा शेळके, काॅ.ज्योती गायकवाड, काॅ.जयश्री ढिवरे, काॅ.संगीता अंभोरे, काॅ.गीता पांडे, बेबी डिडोरे, अश्विनी बोर्डे, काॅ.सुनिता शेजवळ, काॅ.माया भिवसने, काॅ.शिला साठे, काॅ.अनिता पावडे, काॅ.नीता खडसने, रंजना राठोड, सुमन प्रधान, अर्चना घाटे, मनिषा भोळे, सुनिता कांबळे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?