मार्टीची अंमलबजावणी करा, मुस्लिम समाजाचे भरपावसात उपोषण...!

मार्टीची अंमलबजावणी करा, मुस्लिम समाजाचे भरपावसात उपोषण...!
सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी आपली मते मांडली...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)
सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मार्टीचा निर्णय घेतला परंतु त्याची आतापर्यंत अंमलबजावणी न करता कागदावरच असल्याने पावसाळी अधिवेशनाचे लक्ष वेधण्यासाठी मुस्लिम समाजाने मार्टी कृती समीतीच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन भरपावसात हज हाऊस येथे अल्पसंख्यांक आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले.
परंतु अल्पसंख्यांक आयुक्त निवेदन स्विकारण्यासाठी हजर नसल्याने समाजाच्या वतीने नाराजी व्यक्त होत आहे. एका अधिका-याने मागणीचे निवेदन स्विकारले.
निवेदनात म्हटले आहे मार्टी संस्थेचा उद्देश फक्त योजना राबवणे नव्हे, तर राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करुन शासनास उपाय सुचवणे आणि त्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. परंतु संस्थेची अंमलबजावणी रखडल्याने या संशोधनात्मक आणि धोरणात्मक कामांनाही खीळ बसलेली आहे. अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती कृती समीतीचे अध्यक्ष एड अझहर पठाण यांनी दिली.
मार्टी कृती समिती महाराष्ट्र राज्य... मागणी...
500 कोटी रुपये निधीची तरतूद करावी, संस्थेस स्वतंत्र लेखाशीर्ष मंजूर करावा. कंपनी कायदा 2013 कलम 8 अंतर्गत नोंदणी प्रक्रीया पूर्ण करावी. 11 पदांवरील नियुक्त्या त्वरीत करण्यात यावे. छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद) येथे तात्पुरते कार्यालय सुरु करुन संस्था कार्यरत करावी. 6 एकर जागेवर स्थायी मुख्यालय व 6 विभागीय उप केंद्रासाठी निधी मंजूर करावा. येणा-या शैक्षणिक वर्षापासून सर्व योजना प्रभावितणे राबवावेत. एकसमान लाभ धोरण अल्पसंख्यांकांसाठी तातडीने लागू करावे.
प्रमुख उपस्थिती मार्टी कृतीचे अध्यक्ष एड अझहर पठाण, नासेर सिद्दीकी, तय्यब जफर, फैसल खान, इंजि.वाजेद कादरी, अयूब पटेल, मोहंमद असरार, साहेबखान पठाण, फिरदौस फातेमा, रमजानी खान, रहेमान आलम खान, साजिद पटेल, पत्रकार मजहर शेख, सय्यद अब्दुल रहेमान आसिफ, एड वसिम कुरेशी, सर आसिफ, एड शहेबाज पठाण, नबील उज जमान, शेख मुख्तार, डाॅ.अफसर खान, शेख अथर, झाहेद अल कसेरी, संपादक इम्रान बाशवान, जफर शेख आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






