कमान, बुध्द विहाराची भींत, पुनर्वसनाचे आश्वासन मिळाल्यानंतर आंबेडकरनगर अतिक्रमण कार्यवाई

कमान, बुध्द विहाराची भींत, पुनर्वसनाचे आश्वासन मिळाल्यानंतर आंबेडकरनगर अतिक्रमण कार्यवाई
दलित नेत्यांच्या उपस्थितीत आश्वासन दिल्याने अतिक्रमण हटाव मोहीम पुढे सरकली, पोलिस आयुक्त प्रविण पवारांचीही उपस्थिती...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)-
आज सकाळपासून हर्सुल टि पाॅईंट ते सिडको बस स्टँडपर्यंत मनपाची अतिक्रमण कार्यवाहीचा घोडा दुपारी एक वाजता आंबेडकरनगर येथे येऊन अडला. येथे सुमारे दोन तास कार्यवाई थांबली. जेसीबी-पोकलेन अतिक्रमण न काढता थांबवावे लागले. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांना पायाला दुखापत असताना नागरीकांशी चर्चा करण्यासाठी यावे लागले. पोलिस आयुक्त प्रविण पवार समजूत काढण्यासाठी दाखल झाले. दलित नेत्यासह जमाव जमला होता. संजयनगर येथील अतिक्रमण कार्यवाहीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठ नामांतर स्मृती प्रित्यर्थ बंवलेली कमान पाडण्यात आली होती यामुळे दलित समाजात रोश निर्माण झाला होता. बुध्द विहाराची भिंत बाधित झाली होती. कमान व बुध्द विहाराची भिंत मनपाच्या विशेषाधिकारातून बांधून दिली जाईल व मालमत्ता धारकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्यानंतर आंबेडकर नगर येथे थांबलेली कार्यवाई पुढे सरकली.
येथील नागरीक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी गाडीत बसून पाहणी करत चर्चा केली. यावेळी जमावाला शांत केले. शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्यांना शहरात सुविधा मिळावे रस्ते चांगले व मोठे आवश्यक आहे. रस्ता व सर्विस रोड तात्काळ बणवण्यासाठी मंजूरी मिळालेली आहे. विमानतळापासून अजिंठा लेणी पर्यटकांना जाण्यासाठी हा महत्वाचा रस्ता आहे. काळा गणपती कार अपघातात दोन निष्पापांचा जीव गेला आणखी जीव जाणार नाही यासाठी मोठा रस्ता गरजेचा आहे. अशी समजूत आयुक्तांनी काढल्यानंतर येथील नागरीक अतिक्रमण काढून देण्यास तयार झाले. यावेळी अरुण बोर्डे, अमित भुईगळ, महेंद्र सोनवणे व आंबेडकर नगर येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्सूल टी पॉईंट ते सिडको बस स्थानक दरम्यान 445 बांधकामे निष्कासित...
उद्या रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नर मार्गावर कारवाई...
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत हर्सूल टी पॉईंट ते सिडको बस स्थानक दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण 445 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, दुकाने, शेड, कंपाऊंड, शेड, गॅरेज, कमान, जाहिरात फलक,इ. निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 350 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 250 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी 15 जेसीबी, 4 पोकलॅन, 15 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 5 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे,कार्यकारी अभियंता (यांञिकी) अमोल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे,सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम,प्राजक्ता वंजारी,अर्चना राजपूत,रमेश मोरे,संजय सुरडकर, अशोक गिरी,समीउल्लाह,भारत बिरारे,राहूल जाधव,नईम अन्सारी व इमारत निरीक्षक कुणाल भोसले,शिवम घोडके,सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव,सय्यद जमशेद, सय्यद मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे,
सुरज सवंडकर, राहूल मालखेडे, शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते.
उद्या रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप मार्गावर कारवाई...
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू असून उद्या देखील मोहीम सुरू राहणार आहे. उद्या रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप मार्गावर कारवाई करण्यात येणार आहे. या मार्गावर अतिक्रमणे लोकांनी स्वतः काढून घ्यावे, असे आवाहन संतोष वाहूळे यांनी यावेळी केले.
What's Your Reaction?






