ॲड.बाबाभाऊ तायडे यांची ‘शिवसेना विभागप्रमुख’ म्हणून निवड...
प्रभाग क्रमांक.3 च्या
"शिवसेना विभागप्रमुख" पदी
ॲड. बाबाभाऊ तायडे यांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सूचनेनुसार व आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली, आज प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे आणि विकासकामांसाठी सतत पाठपुरावा करणारे ॲड.बाबाभाऊ तायडे यांची ‘शिवसेना विभागप्रमुख’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या संबंधीचे अधिकृत नियुक्तीपत्र आज आमदार प्रदीपजी जैस्वाल आणि शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत यांच्या हस्ते ॲड. बाबाभाऊ तायडे यांना प्रदान करण्यात आले. या नियुक्तीबद्दल व पुढील वाटचालीस
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, कार्यसम्राट आमदार प्रदीपजी जैस्वाल, मध्य विधानसभेचे शहर प्रमुख विश्वनाथजी राजपूत, जिल्हाप्रमुख आमदार विलास बापू भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्रजी जंजाळ, शहर प्रमुख विजयजी वाघचौरे, युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश जैस्वाल सर्व शिवसेनेचे नगरसेवक सर्व उपशहर प्रमुख व शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी* आणि परिसरातील शिवसैनिक आणि नागरिकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला असून,
नव्या जबाबदारीतून विभागातील शिवसेना संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास या वेळी व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?