मनपा समोर पथविक्रेत्यांनी केली निदर्शने...

 0
मनपा समोर पथविक्रेत्यांनी केली निदर्शने...

पथविक्रेत्यांनी मनपा कार्यालयासमोर जोरदार निदर्शने... ! 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 23(डि-24 न्यूज)-पथविक्रेता कायदा 2014 विरोधात काम करणाऱ्या महानगरपालिकेला शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने त्यांचा बेकायदेशीरपणा लक्षात आणून दिला, बेकायदेशीरपणा दुरुस्त करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी युनियनला दिले. 

 

याबाबत असे की, 

निवेदन सादर करते की, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयीन संकेत स्थळावर 14098 पथविक्रेत्यांची मतदार यादी जाहीर प्रकाशित करण्यात आली आहे. जी की, बेकायदेशीर असुन, ती अंतीम करता येणार नाही. सदर मतदार यादी अंतीम केल्यास महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील हजारो पथविक्रेत्यांच्या संवैधानिक मतदानाच्या अधिकाराचे हनन होणार आहे. महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील हजारो पथविक्रेते सदर बेकायदेशीर मतदार यादीमुळे मतदानापासून वंचित राहणार आहेत. अध्यक्ष, अस्थायी शहर पथविक्रेता समिती, (अंतर्गत पथविक्रेता उपजिवीका संरक्षण व विनिमयन कायदा 2014) छत्रपती संभाजीनगर म्हणून सदर कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही आयुक्तांची असल्यामुळे त्यांनी तटस्थपणे काम करणे अपेक्षीत असतांनाही तसेच दि. 13 ऑक्टोंबर 2021 रोजी वर्तमानपत्रांमध्ये मध्ये प्रकाशित केलेल्या 14098 पथविक्रेत्यांच्या सर्वे वर 127 आक्षेप व हरकती आपल्याकडे जमा झालेल्या असतांना त्यावर निकाल न देता व त्यांचा विचार न करता तसेच लॉकडाऊन नंतरच्या नजिकच्या काळात झालेला सदर 15 दिवसाचा अपूर्ण व बेकायदेशीर सर्वे असतांना केवळ 14098 पथविक्रेते शहरात असल्याचे अंतिम करुन बेकायदेशीरपणे 14098 पथविक्रेत्यांची मतदार यादी जाहीर/प्रकाशित करणे म्हणजे पथविक्रेता उपजिवीका संरक्षण व विनिमयन कायदा 2014 व संविधानातील तरतुदींचा भंग होय. ही बाब आयुक्तांच्या लक्षात आणून देण्यात आली. बहुसंख्य अशिक्षीत असणा-या पथविक्रेत्यांना वर्तमानपत्र वाचने शक्य नसतांना त्यांना अंधारात ठेवुन केलेली बेकायदेशीर प्रक्रिया ही पारदर्शक नाही. सदर सर्व जाहीर प्रगटनाचे वाचन प्रत्येक चौकात होणे आवश्यक होते, सदर वेळापत्रके सर्व पथविक्रेत्यांना कळतील अश्या माध्यमातुन प्रसारीत होणे आवश्यक होते. परंतू तसे न करता, गुपचुप काही वर्तमानपत्रात छोटया फाँटमध्ये केवळ सदर वर्तमानपत्र वाचना-या पथविक्रेत्यांनाच सदर जाहीर प्रगटन कळेल अशी गैरसोय मुदाम करण्यात आली, या मागचा उद्देश चांगला नाही हे पुर्वीच्या आक्षेपांचा विचार न करता व बेकायदेशीरपणे केवळ 14098 चाच सर्वे अंतीम म्हणून जाहीर केल्याने दिसुन येते. असे निवेदनात म्हटलेले आहे. 

शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन निवेदनाद्वारे कोविड काळात अनलॉक दोन च्या वेळेस दिनांक : 28/02/2022 पूर्वी केलेल्या 14098 पथविक्रेत्यांना पथविक्रेता उपजिवीका संरक्षण व विनिमयन कायदा 2014 कायदयाच्या कलम 5 ची पुर्तता करुन घेऊन तत्काळ विक्री प्रमाणपत्र देण्यात यावे, दिनांक 28/02/2022 रोजीच्या शहर पथविक्रेता समितीच्या बैठकीपर्यंत प्राप्त झालेले शहर भगतसिंग हॉकर्स युनियनचे दि.9/11/2021 व इतर पथविक्रेत्यांचे 126 आक्षेप व हरकतींची सुनवाई घेऊन त्यावर निकाल देऊन शहरातील उर्वरीत अंदाजे 1,00,000 पथविक्रेत्यांचा सर्वे पथविक्रेता उपजिवीका संरक्षण व विनिमयन कायदा 2014 च्या कलम 3 प्रमाणे करुन, त्यांना विक्री प्रमाणपत्र दिल्यानंतरच पथविक्रेत्यांची कायदयाप्रमाणे मतदार यादी अंतीम करता येईल. तसेच सद्या महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या संकेत स्थळावर प्रकाशित / जाहीर केलेली 14098 पथविक्रेत्यांची मतदार यादी वरील आक्षेप व हरकतींचा निकाल लागेपर्यंत स्थगीत / रद्द करावे ही नम्र विनंती, 14098 पथविक्रेत्यांना तत्काळ विक्रेता प्रमाणपत्र कायद्याप्रमाणे देण्यात यावे, अस्थायी शहर पथविक्रेता समितीची बैठक तत्काळ बोलविण्यात यावी व सदर बैठकीत शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन व आयटक यांच्या प्रतिनिधीना सदर बैठकीत आमंत्रीत करावे, मनपा ने घेतलेले सर्व बेकायदेशीर निर्णय रद्द करावेत व येथुन पुढे कायदेशीर निर्णय घ्यावेत. अन्यथा आपल्या बेकायदेशीर निर्णया विरुध्द योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे. 

मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष जम्मू आनंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, तसेच एन यु एल एम विभागाला शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन सोबत समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले. तसेच कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले.  

निवेदन देण्यापूर्वी मनपा टाऊन हॉल कार्यालयाच्या गेट समोर, आता विक्रेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. कायद्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे, विक्री प्रमाणपत्र दिलेच पाहिजे, कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही इत्यादी घोषणांनी मनपा गेट दणाणून गेले. निदर्शने सुरू असताना खासदार डॉ. कल्याण काळे त्यांनीही या निदर्शनात सहभाग घेतला व आंदोलनाला शुभेच्छा दिल्या. आयुक्तांना त्याचे पालन करायला सांगतो व संसदेतही मांडतो असेही आश्वासन दिले व या निदर्शनात अँड . अभय टाकसाळ, राजू हिवराळे, विजय रोजेकर, शेख इसाक, रफिक बक्ष, शेख शकील, अँड. उमेश इंगळे, शेख अमजद, वसीम खान, जुबेर खान, शेख फिरोज, संजय गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पथविक्रेता सहभागी झाले होते. यावेळी चेतन कुमावत, रविराज काथार, कृष्णराम डांगा, दीपक वानखेडे, रामेश्वर टिके, राजू रोजेकर, बलदेवसिंग राजपूत, रणजित कोंमलले, रामेश्वर कावळे, राजू भवर, नितीन मेघावाले, जगननाथ काथार, सुनील देशमुख, शकील शेख, शेख अब्दुल, गणेश रोजेकर, विनोद भवर, राजु भवर, रमेश काथार, सुरेश काथार, योगेश खरात, रमेश खरात, विषाल खरात, साबेर शेख, गणेश तुपसौदर , शेख ईसाक, शेख यासीन, याहुल खान, सलीम भाई, इब्राहीम भाई, सीभु भाई, फईम भाई,

, फैजल शेख, गुलशेर शेख, सलमान बागवान हे देखील सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow