भिमनगर-भावसिंगपूरा येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी...

भिमनगर-भावसिंगपूरा येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी...
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना प्रस्ताव पाठविण्याची शिवसेनेची पोलिस आयुक्तांना मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) - भिमनगर-भावसिंगपुरा परिसराची लोकसंख्या 35 ते 40 हजार झालेली आहे. अनेकदा येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. परिसरात अवैध धंदे व गुन्हेगारी वाढत आहे त्याला वचक बसविण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रस्ताव पाठविण्याची मागणी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना निवेदनाद्वारे अॅड बाबाभाऊ गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
परिसरात 7 ते 8 खूनाच्या घटना घडल्या. युवक अवैध नशेच्या आहारी जात असल्याने व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीकडे वळत आहे. कुख्यात गुंड परिसरात दहशत निर्माण करत असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे महाविद्यालयीन, शाळकरी मुलींनी, महीलांना संध्याकाळच्या नंतर घराबाहेर पडण्यास धास्ती निर्माण झाली आहे. छावणी पोलिस ठाण्याचे अंतर 4 ते 4 किलोमीटर असून परिसराची व्याप्ती वाढत आहे. यासाठी तात्काळ पोलिस आयुक्तांनी येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा हि विनंती केली आहे. लवकर मागणी मान्य झाली नाही तर पोलिस आयुक्त कार्यालयासमोर हजारो महीला व नागरिक आमरण उपोषणाला बसणार असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर जेष्ठ नागरिक सुभेदार सुभाष कदम, सुभेदार शेषराव आराक, राजु जाधव, धम्मानंद सुरासे, बळीराम तिगोटे, दिलिप इंगळे, सुरज जाधव, अनिल गायकवाड, अॉड खोब्रागडे, विलास अवचार, गौतम प्रधान, अमोल बनसोडे, सुनील सिरसाट, दिलिप सिरसाट, डॉ.प्रधान, डॉ.बोरसे, डॉ.दाभाडे, डॉ.अविनाश सोनवणे, डॉ.राहुल डोंगरदिवे, डॉ.भाग्यशाली पैठणे, विजय खोतकर, संघपाल गायकवाड, महेंद्र उके, प्रकाश जमधडे, अॅड सुमेध गायसमुद्रे, रतन सुरडकर, शरद पगारे, नाईक हरि राऊत, सुभेदार शिवाजी घोबले, अजय दांडगे, विजय गायकवाड, कॅप्टन रमेश खरात, राजेश तिरपुडे, सौ.लताताई थोरात, सौ.उषाताई वडई, सौ.सुनंदाताई इंगळे, सौ.वर्षाताई मेश्राम, प्राचार्या कामिनीताई गोरे, सौ.चारुशिलाताई डोंगरे, डॉ.ज्योत्सना कांबळे, डॉ.स्नेहल गायकवाड, सौ.अर्चना धाबे, सौ. सुशिला इंगळे, सौ.रत्नप्रभा वानखेडे, अॅड करुणा जाधव, अॅड रुपाली इंगळे आदींची सही आहे.
What's Your Reaction?






