मनपाच्या वर्धापनदिनानिमित्त शहरात वाहनांचे संचलन....!

 0
मनपाच्या वर्धापनदिनानिमित्त शहरात वाहनांचे संचलन....!

वर्धापन दिनानिमित्त मनपाचे वाहनांचे शहरभर संचालन...

 30 प्रकारचे वाहनांचे समावेश...

प्रशासकांनी पुष्पपाखळ्यानी केले संचालनाचे स्वागत...

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) आज 8 डिसेंम्बर रोजी

 महानगरपालिकेच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या सेवेत शामिल वाहनांच्या संचालन करण्यात आले.

 सदरील संचलनचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी यांत्रिकी विभाग सेंट्रल नाका येथे हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी शहर अभियंता ए बी देशमुख, मुख्य लेखापरीक्षक शि बा नाईकवाडे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ यांची उपस्थिती होती.

सदरील संचालनची सुरुवात सेंट्रल नाका येथून झाली तर सेवन हिल, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सिडको बसस्थानक, जळगाव रोड, हर्सुल टी पॉइंट, दिल्ली गेट, बसस्टँड, बाबा पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, महानुभाव चौक, बीड बायपास, शहानूर मियां दर्गा, सुत गिरणी चौक, सेवन हिल, क्रांती चौक, महावीर चौक, बसस्टँड मार्गे आमखास मैदान येथे समारोप झाले.

सदरील संचलनात महापालिकेतील 30 प्रकारची वाहनांचा समावेश होता. 

सदरील संचलनचे उद्देश नागरिकांना महापालिकेची क्षमता तसेच त्यांच्या सेवेत किती प्रकारचे वाहने उपलब्ध आहे याची जाणीव करून देणे हा होता.

सदरील वाहनांचे संचालनात जेसीबी, हुकलोडर, रुग्णवाहिका, टिपर, ट्रॅक्टर लोडर व इतर वेगवेगळ्या जड आणि अजड वाहनांच्या समावेश होता.

जेव्हा सदरील संचालन आयुक्त बंगल्या (जलश्री) मार्गे जात होता तेव्हा आयुक्त जी श्रीकांत यांनी परिवारासह रोडवर येऊन संचालनाचे पुष्पपांखळ्याने स्वागत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow