महापालिकेच्या विद्यालयात डिजिटल पल्स व रीडींग फेअरचे उत्साहात उद्घाटन...
महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालय मयूरबन कॉलनी येथे डिजिटल पल्स व रीडिंग फेअर चे उत्साहात उद्घाटन...
विद्यार्थी आत्मविश्वासाने कॉम्प्युटर हाताळताना बघून मनस्वी आनंद झाला अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील...
दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले आहे...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - प्रियदर्शनी शाळेत ‘डीएमएफ ॲन्युअल शोकेस (2025-26)’ चे यशस्वी व कौतुकास्पद आयोजन
केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, प्रियदर्शनी शाळा येथे डी मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल लिटरसी व रीडिंग प्रोग्राम अंतर्गत “डीएमएफ ॲन्युअल शोकेस (2025-26)” या कार्यक्रमाचे अत्यंत यशस्वी व कौतुकास्पद आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले याप्रसंगी प्रमुखा अतिथी महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, श्रीमती डॉक्टर मंडलेचा, उपायुक्त अंकुश पांढरे नगरसेविका अर्चना निळकंठ व अनिता मानकापे, विद्या प्राधिकरण च्या प्राचार्या शैलजा दराडे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर मनपा शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, गोविंद बाराबोटे स्वप्निल सरदार
आर जे सेजल, मुंबई येथील डी मार्ट चे पुलकित कुमार
मॅनेजर,सिद्धांत मालवणकर
प्रोग्राम असोसिएट हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी प्रास्ताविक करून सर्व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या डिजिटल व वाचन कौशल्यांचा विकास साधण्यासाठी विविध शैक्षणिक स्टॉल्स उभारण्यात आले होते.
डिजिटल लिटरसी प्रोग्राम (डीएलपी) अंतर्गत टीचर जर्नी, स्टुडन्ट जर्नी, गुगल डॉक्स, गुगल शीट्स, इंटरनेट, स्क्रॅच, पेंट यांसारख्या विषयांवर आधारित स्टॉल्स ठेवण्यात आले होते.
या स्टॉल्सच्या माध्यमातून विविध शैक्षणिक खेळ घेऊन विद्यार्थ्यांना संगणकाच्या वापराबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
रीडिंग प्रोग्राम रीडिंग लॅडर, बुक काउंटर, पपेट शो, इमोशन काउंटर, पोएम काउंटर इत्यादी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची वाचन पातळी सुधारण्यावर भर देण्यात आला. वाचनाशी संबंधित विविध खेळ व कृतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे, ज्ञानाचे व कौशल्यांचे अतिशय सुंदर प्रदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्टॉलवर आत्मविश्वासाने माहिती देत उपक्रम सादर केले. स्टॉलला भेट देणाऱ्या अधिकारी व पालकांनी प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी अत्यंत समाधानकारक व आत्मविश्वासपूर्ण उत्तरे दिली.
विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने व जबाबदारीने सादर केल्यामुळे सर्वांचे विशेष लक्ष वेधले.
व डी मार्ट फाउंडेशनचा संपूर्ण स्टाफ तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डी मार्ट चे संतोष थुट्टे, बी आर राठोड, तेजस्विनी देसले रश्मी होनमुटे, प्रतिभा गावंडे, काकासाहेब जाधव, सचिन लवेरा, प्रकाश इंगळे मोनिका चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?