नाराजांची तलवार म्यान, इत्तेहाद दाखवत वक्फ कायद्याच्या विरोधात एकजूट दाखवून एकगठ्ठा मते एमआयएमला देवून विरोधकांची जमानत जप्त करा - ओवेसी
नाराज परतले, आपले मत एकजूट करत वक्फ कायद्याच्या विरोधात देवून विरोधकांना धडा शिकवा - ओवेसी
तिकीट वाटपात घोळ झाल्याचा आरोप करणारे नासेर सिद्दीकी यांची तलवार म्यान, शेख अहेमद, मोहम्मद असरार व्यासपीठावर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) - धार्मिक स्थळांवर संकटात आणण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ संशोधन हा काळा कायदा आणला. एकजूट दाखवून येणाऱ्या 15 जानेवारीला एकगठ्ठा मते एम आय एम ला देवून दाखवून द्या हा कायदा संविधान विरोधी व धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारा आहे. असे भावनिक आवाहन ऐतिहासिक आमखास मैदानावर जाहीर सभेत एमआयएमचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी केले.
त्यांनी विरोधकांवर टीका करताना आठवण करून दिली अजित पवार यांची राष्ट्रवादी, चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम यांच्या पक्षाने वक्फ संशोधन कायद्याला पाठिंबा दिला म्हणून यांना या निवडणुकीत धडा शिकवा. फडणवीस, शिंदे, शरद पवार व विरोधी पक्ष आपल्या इत्तेहाद विरोधात आहे. आमखास मैदान सारख्या मोठ्या सभा गाजवण्यासाठी विरोधकांना माणसे आणण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात परंतु एम आय एम शी असलेले प्रेम व ह्रदयाचे नाते वेगळेच आहे. आपण नेहमी एम आय एम ला साथ दिली यावेळी सुध्दा साथ द्यायला विसरू नका. निवडणूक झाल्यानंतर पक्ष संघटनेत बदल करायचे आहे. ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांच्याशी बोललो त्यांच्या शंका दूर करुन न्याय देणार. ज्यांनी इम्तियाज जलिल यांच्या गाडीवर हल्ला केला आशा लोकांना या निवडणुकीत घरी बसवा यांची जमानत जप्त करा. इम्तियाज जलिल व नासेर सिद्दीकी यांना विधानसभा निवडणुकीत हरवणा-या विरोधकांना धडा शिकवा. माझ्या गाडीवर सहा गोळ्या झाडल्या मी घाबरलो नाही. गुंडांच्या टोळ्या शहरात आहे त्यांच्याशी बदला घेण्यासाठी कायदा हातात घेऊ नका तर मतांच्या माध्यमातून दाखवून द्या इत्तेहाद काय असते. ते इत्तेहाद विरोधी आहे. विरोधकांशी हातमिळवणी करून इत्तेहादला ठेच पोहचवण्याचा ते प्रयत्न करत आहे त्यांना यशस्वी होऊ देवू नका. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल, नासेर सिद्दीकी, मोहम्मद असरार, कुणाल खरात, शेख अहेमद, विकास एडके, मोनिका मुळे, समीर साजिद बिल्डर, अमजद चाचू, वाजेद जहागिरदार, ओसामा अब्दुल कदिर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांची भाषणे झाली.
What's Your Reaction?