इम्तियाज जलिल यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, हल्लेखोर चढले होते गाडीवर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अप्रिय घटना नाही...

 0
इम्तियाज जलिल यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, हल्लेखोर चढले होते गाडीवर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अप्रिय घटना नाही...

इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न, गाडीतून बाहेर काढून मारण्यासाठी गाडीवर चढले हल्लेखोर...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सुरू झाला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. यंदा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन शिवसेना, भाजप आणि एमआयएम पक्ष येथे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी, वंचितही मैदानात आहे. दरम्यान, एमआयएम (MIM) पक्षातील नाराज गटाकडून माजी खासदार आणि पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. धावत्या कारच्या मागे पळून जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न शहागंज परिसरात करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून ही मारहाण करण्यात आली आहे अशी चर्चा येथे सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्या वाहनात इम्तियाज जलील पुढच्या सीटवर बसले होते. सुरुवातीला काळे झेंडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. इम्तियाज जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती आहे. या घटनेमुळे उमेदवारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. प्रचार रॅलीच्या दरम्यान बायजीपुरा जिन्सी भागात ही घटना घडली आहे. एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी आहे. इतर जे कार्यकर्ते आहेत, त्या संदर्भात चौकशी सुरु आहे. सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी व जीन्सी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली व तणाव शांत झाला. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काँग्रेसकडून उभे असलेले एक उमेदवार आहेत त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आला आहे. एमआयएमने संभाजीनगरमध्ये 22 नगरसेवकांची उमेदवारी कापून नवीन चेह-यांना संधी दिली आहे यामुळे नाराजी पसरली आहे. त्यावेळी, देखील असंतोष पसरला होता. त्याचे पडसाद बायजीपुरा येथे पाहायला मिळाले होते. आज घडलेल्या राड्यात एक जण जखमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये रैली दरम्यान हि घटना घडल्याने खळबळ उडाली. जीन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

इम्तियाज जलिल यांनी वंचितचे उमेदवार कलिम कुरेशी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला तर कलिम कुरेशी यांनी सांगितले त्यांच्या पक्षात तिकिटावरुन नाराजी आहे. त्यांच्या पक्षाची हवा खराब आहे हा हल्ला त्यांनीच घडवून आणला आहे. हल्ला करणारे लोक आमचे नाही काँग्रेस आणि वंचितचा पॅनल जिंकणार असल्याने असले राजकारण केले जात आहेत. सिटी चौक व जीन्सी पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांकडून तक्रार देण्यासाठी कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow