अकोटमध्ये राजकीय भूकंप, सत्तेसाठी भाजपा-एमआयएम साथ साथ...

 0
अकोटमध्ये राजकीय भूकंप, सत्तेसाठी भाजपा-एमआयएम साथ साथ...

अकोटमध्ये राजकीय भुकंप, सत्तेसाठी भाजपा-एमआयएमची युती

अकोला, दि.7(डि-24 न्यूज) -

अकोटमध्ये सत्तेसाठी भाजपा-एमआयएमची युती झाली आहे. नगरपरिषद निवडणूक भाजपाचे श्रीमती माया घुले या नगराध्यक्ष बनल्या पण भाजपाकडे बहुमत नसल्याने भाजपा, एमआयएम, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने मिळून अकोट विकास मंचाची स्थापना करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदणी केली आहे. या विकास मंचाचे अध्यक्ष रवि ठाकूर आहेत. सर्वात जास्त 11 नगरसेवक भाजपाचे निवडून आले. एमआयएमचे 5, राष्ट्रवादी अजित पवार गट 2, शिंदे सेना 1 , प्रहार 3, शिवसेना ठाकरे गट 2, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी 1 असे एकूण 25 नगरसेवक निवडून आले होते. बहुमताच्या आकड्यासाठी विचारधारा सोडून हे पक्ष हिंदूत्वासाठी राजकारण करणारे पक्ष सत्तेसाठी सोबत आल्याने विरोधक टिका करत आहे. उध्दव सेनेचे आमदार सचिन अहिर यांनी भाजपावर टिका केली. आमच्यावर आरोप करता मग हे काय आहे. आता कुठे गेले भाजपाचे हिंदूत्व. एमआयएम जातीयवादी पक्षांशी युती केली एक दुस-याच्या विरोधात टिका करतात आणि खुर्चासाठी सोबत येतात अशी टिका त्यांनी केली आहे. या राजकीय भुकंपाचा या महापालिका निवडणुकीत परिणाम होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत माजी महापौर रशीद खान मामू हे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उभे आहेत. भाजपा व शिंदे सेनेचे नेते उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे मग त्यांचे हिंदूत्व आता कोठे गेले अशी टिका विरोधक करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow