बासपाचे वाजत गाजत आंदोलन, समाजकल्याण अधिकारी यांना दिले निवेदन

 0
बासपाचे वाजत गाजत आंदोलन, समाजकल्याण अधिकारी यांना दिले निवेदन

शासनाच्या विविध योजनांची कठोर अंमलबजावणी करा 

बसपाने वाजत गाजत जाऊन दिले समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांना निवेदन 

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.6(डि-24 न्यूज) ॲट्रॉसिटी अंतर्गत मृत्यू पावलेल्याच्या पाल्यांना सरकारी नोकरी द्यावी त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत द्यावी त्यांच्या पाल्याचे शिक्षण सुरू करावे. ॲट्रॉसिटी पीडित कुटुंबीयांना रमाई आवास योजना अंतर्गत पक्के घरे बांधून द्यावी या व इतर शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज दिनांक 6 सप्टेंबर शुक्रवारी दुपारी समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना वाजत गाजत जाऊन निवेदन देण्यात आले.

 समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीयांसाठी विविध योजना शासनाने सुरू केल्या आहेत परंतु समाज कल्याण विभागाच्या वतीने त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे आज शुक्रवारी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव मुकुंद सोनवणे, जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक न्याय भवन येथील प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकावडे यांना निवेदन दिले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आणि वाजत गाजत जाऊन हे निवेदन दिले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे सामाजिक न्याय भवन परिसर दणाणून गेला होता. कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेवटी एका शिष्टमंडळाने जाऊन सोनकवडे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. विशेष म्हणजे यावेळी शहरातील विविध बुद्ध विहारातील भंतेजींची उपस्थिती होती. प्रादेशिक उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ॲट्रॉसिटी पीडित कुटुंबीयांच्या वारसांना विभागामार्फत नोकरी द्यावी मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना केंद्राचे पाच लाख रुपयांची योजना सुरू करावी. ॲट्रॉसिटीत पीडित कुटुंबीयांच्या पाल्यांसाठी शिक्षण सुरू करावे आणि प्रादेशिक उपायुक्तांनी अत्याचार पीडित कुटुंबीयांची भेट घ्यावी. ॲट्रॉसिटी पीडित कुटुंबीयांना रमाई घरकुल आवास योजनेची अंमलबजावणी करावी. प्रादेशिक कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पीडित कुटुंबाची चतुर्थ श्रेणी कर्मचारी भेटू देत नाही त्यांची सखोल चौकशी करावी. विभागांतर्गत मागील तीन वर्षांमध्ये ॲट्रॉसिटी घडलेल्या प्रकरणांमध्ये आणि ॲट्रॉसिटी पीडित कुटुंबीयांची प्रादेशिक उपायुक्त मार्फत भेट दिली नाही या कुटुंबियाची प्रादेशिक उपायुक्तांनी भेट घ्यावी प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील 36- 36 किंवा औद्योगिक प्रस्तावातील त्रुट्या आपल्या स्तरावर दूर कराव्यात. यासह 14 मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश आहे पक्षाच्यावतीने दिलेल्या निवेदनाच्या मागणी संदर्भात आठ दिवसात खुलासा करण्यात यावा अन्यथा 17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल व समाज कल्याण आयुक्त पुणे येथे 24 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. बसपाचे प्रदेश महासचिव मुकुंद सोनवणे, जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे, ज्येष्ठ नेते प्रल्हाद हिवाळे, राघोजी पुंडगे, जिल्हा महासचिव विजय बचके, योगीराज आनंद, जिल्हा सचिव अमोल पवार, विष्णू वाघमारे, कुणाल लांडगे, सचिन महापुरे, भगवान पवार, सिद्धार्थ पवार, राहुल साळवे, सचिन चौरे, अनिल साळवे, राजू केदारे, सुनील पटेकर, मिलिंद येडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow