300 वर्ष किराडपुरा येथील जुने प्राचिन राममंदिर येथे रामनवमी, मुस्लिम समाजाने दिला मानवता व भाईचा-याचा संदेश
 
                                 
300 वर्ष किराडपुरा येथील जुने प्राचिन राममंदिर येथे रामनवमी, मुस्लिम समाजाने दिला मानवता व भाईचा-याचा संदेश
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) शहरातील किराडपुरा येथे 300 वर्षे जुने प्राचिन राममंदिर येथे रामनवमीनिमित्ताने रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून रामभक्तांनी गर्दी केली. राममंदिर समोर रस्त्यावर मंडप उभारुन रामभक्तांचे व लोकप्रतिनिधी यांचे मुस्लिम बांधवांनी गुलाबपुष्प हातात देऊन स्वागत केले. तापत्या उन्हात येणाऱ्या भाविकांसाठी थंड शरबत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. माजी नगरसेवक इब्राहिम पटेल व हाजी इसाक खान व किराडपुरा येथील नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे भाविकांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजता राममंदिर येथून सिडको येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
रामनवमी उत्सव साजरा करताना प्रभु श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. रामललल्लाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली. सामाजिक संघटनांच्या वतीने शहरात अन्नदान, रक्तदान शिबीर घेत सामाजिक बांधिलकी जपली. शहरातील किराडपुरा राममंदिर, उस्मानपुरा व समर्थनगर राम मंदीरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. श्रीरामचंद्र बालाजी (मठ) ट्रस्टच्या वतीने श्रीरामवमी जन्मोत्सव श्रीराम मंदिर येथे साजरा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवत उत्सव साजरा केला. सकाळी पुजारी विकास पालकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी 12 वाजता आरती करुन जय श्रीराम जयघोष करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त प्रविण पवार, मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, पृथ्वीराज पवार, बंडू ओक, मानसिंग पवार, दयाराम बसैय्ये, उत्तमराव मनसुटे, माधुरी अदवंत देशमुख, शिवाजी दांडगे, दिपक ढाकणे, बापू घडामोडे व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
 
 
 
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            