विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले गेल्या 40 वर्षांपासून समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री संजय सिरसाट होणार आहे. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता बुद्ध लेणी भंतेजींना भोजनदान करण्यात येईल. त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल. 11 एप्रिल रोजी समितीच्या कार्यालयात सर्वरोगनिदान शिबिर आयोजित केले आहे. तपासणीत आढळून आलेल्या रुग्णांवर समितीच्या वतीने विनामुल्य शस्त्रक्रिया करण्यात येईल. 12 एप्रिल रोजी उस्मानपुरा येथे भीम रजनीचे आयोजन सायंकाळी सात वाजता केले आहे. कार्यक्रमानंतर भोजनदान करण्यात येईल. 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता भडकलगेट येथे फटाक्यांची आतिषबाजी करून केक कापून जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. 14 एप्रिल रोजी भडकलगेट येथे सकाळी 9.30 वाजता पालकमंत्री संजय सिरसाट व समितीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल. अभिवादन सभेत बहुजन विकास व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सायंकाळी 6.30 वाजता क्रांतीचौक येथून पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या हस्ते पहील्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून मिरवणुकीला सुरुवात केली जाईल. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी समितीच्या वतीने सर्व स्वयंसेवक कार्यरत राहतील असे आवाहन समितीने केले आहे.
पत्रकार परिषदेत मुख्य मार्गदर्शक बाबुराव कदम, समितीचे अध्यक्ष नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय, कार्याध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, स्वागताध्यक्ष शिवाजी कवडे उपस्थित होते.
What's Your Reaction?






