नारेगावाच्या नागरिकांच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणने बदलली डिपी

 0
नारेगावाच्या नागरिकांच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणने बदलली डिपी

नारेगावाच्या नागरिकांच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणने बदलली डिपी

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) ऐन दिवाळीच्या वेळी नारेगावाच्या नागरिकांना काही दिवसांपासून विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. विजेच्या डिपीवर जास्त लोड असल्याने नेहमी डिपी नादुरुस्त होत नसल्याने विजेच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा चिकलठाणा महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली तरीही काम होत नसल्याने येथील नागरिकांनी कुटुंबासहीत या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. काही तास चाललेल्या या आंदोलनात आंदोलक अक्रामक झाले होते. शेकडो नागरिकांचा येथे जमाव जमला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत एमआयएमचे युवा शहराध्यक्ष मोहंमद असरार यांनी येथील नागरिकांची समस्या आजच सोडवण्याची मागणी अक्रामकपणे मांडली. दिपावलीच्या सुट्टीमुळे मनुष्यबळ कमी असल्याने डिपी दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत फातेमा डिपी हि 200 KVA बदलून मोठी डिपी टाकली असल्याने येथील अंधार दुर झाला व विजपुरवठा पूर्ववत केल्याने नागरिकांनी महावितरणचे आभार मानले.

यावेळी परिसरातील मतीन पटेल, राजु पठाण, फारुख शहा, जावेद भाई, अकबर अन्सारी आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow