परदेशात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी, हाॅरीजन ओव्हरसीस कन्सलटन्सीसोबत करा संपर्क

विदेशात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे आता झाले आहे सोपे....
हॉरीजन ओव्हरसीस कन्सलटन्सीचे भव्य दिव्य उद्घाटन....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) मराठवाड्यातील तरुण - तरुणीचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न साकारण्यासाठी
मोफत समुउदपदेशन सेमीनार
आज प्रोझोन ट्रेड सेंटर येथे हॉरीजन ओव्हरसीस कन्सलटन्सीचे मान्यवरांची व शहरातील सर्व नामवर वृत्तपत्रांचे नामाकिंत मान्यवर पत्रकारांच्या उपस्थीतीत उद्घाटन संपन्न झाले. प्रोझोन मॉल येथे उभारण्यात आलेल्या प्रोझोन ट्रेड सेंटरच्या दुसर्या मजल्यावर असलेल्या हॉरीजन ओव्हरसीस कन्सल्टन्सीची स्थापना ही पैसे कमविण्याच्या हेतुने केलेली नसून ती केवळ आपल्या विभागातील विद्यार्थी-विद्यार्थींनीचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न साकारण्याच्या हेतुने करण्यात आली आहे. असे मत कन्सलटन्सीचे संचालक रोटरीयन एम. एन. हसन सिद्दीकी व गुलाम जावेद यानी व्यक्त केले.
उच्च शिक्षण पदवी व पदव्युत्तर शिक्षण प्रदेशात घेऊन महाराष्ट्राच्या इतर भागातील तसेच देशातील दुसर्या राज्यातील विद्यार्थी ज्यापमाणे प्रगतीचे शिखर गाठत आहे, अगदी त्याचप्रमाणे मराठवाड्यातील विद्यार्थीचे विकासाचे शिखर गाठण्यासाठी बघीतलेले स्वप्न कृतीत यावे, यासाठी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन व त्यांचे समुउपदेशन करता यावे, व ती संधी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी हॉरीजन येथे २५ देशातील १६०० विद्यापीठात १ लाखाहून अधिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी हॉरीजन मार्फत विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाईल. यासाठी मराठवाड्यातील १२वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर विदेशात जाऊन कोणत्याही अभ्यासक्रमात दाखला घेता येईल व आपले भविष्य उज्वल करता येईल या उद्देशानेच मोफत मार्गदर्शन व सल्ला आणि समुउपदेशन करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी व निवडीचे स्वप्न साकारण्यासाठी विदेशातील कोणत्या विद्यापीठात कोणत्या प्रकारची सुख सुविधा आणि अभ्यासक्रम आहेत. या बाबतची देखील माहिती देण्यात येईल. या करीता जागतीक मानांकित व नामाकिंत विद्यापीठासोबत हॉरीजन ने करार केलेला आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगातील सर्वोउत्तम विद्यापीठात प्रवेश घेता येईल. त्यात अमेरीका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर, यु.के., जर्मनी, प्रâान्स, दुबई, मालटा, जापान, रशिया या सारख्या शैक्षणिक दृष्ट्या विकसित देशातले सर्व नामाकिंत व मानाकिंत विद्यापीठात मराठवाड्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना १२वीच्या परीक्षेनंतर इतर अभ्यासक्रमासोबत, `नीट’ परीक्षेत योग्य प्रतिशत गुण न मिळालेल्या मुला मुलींना देखील निराश होण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी आता हॉरीजन मार्फत कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन त्यांचे स्वप्न साकार करता येईल. तसेच अभियांत्रिकी आणि विधीची पदवी व इतर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी हॉरीजन इच्छुक विद्यार्थ्यांना दैनंदिन स्तरावर विनामुल्य समुउपदेशन सेमिनारचे आयोजन रोज सकाळी १०.०० ते ६.०० वाजे.पर्यंत करण्यासाठी वचनबद्ध आहे. करीता सर्व विद्यार्थी व विद्यार्थी पालकांनी आपल्या नावाची नोंदणी करून या या मौल्यवान सेमीनर मध्ये सहभागी व्हावे, असे ही होरीजन तर्फे संचालकांनी आव्हानीत केले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता नाही मात्र शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठण्याची इच्छा मनात बाळगूण आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्याचीही व्यवस्था करण्यासाठी व बँकेतून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी देखील मार्गदर्शन हॉरीजन तर्फे करण्यात येईल. तसेच समुउपदेशनापासून प्रवेश मिळे पर्यंत व शिबीरासाठी नाव नोंदणी पासून प्रवेश मिळे पर्यंत पुर्णपणे सहकार्य करण्याचे अभिवचन देखील हॉरीजन तर्फे देण्यात आलेले आहे. यात आय. ई. एल. टी. एस. आणि जर्मन भाषा चे शिक्षण घेण्यासाठी ही मोलाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. अशी माहिती संस्थेचे संचालक यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.
सदरील उद्घटन संचालक रोटरीयन एम. एन. हसन सिद्दीकी, गुलाम जावेद, जर्मन शिक्षिका कु. मयुरा मधुकर डोले आणि सागर वाडाटकर (क्रिडीला फायन्स) व पत्रकार, आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






