एमआयएम मध्य प्रदेश व राजस्थान निवडणुकीच्या मैदानात

 0
एमआयएम मध्य प्रदेश व राजस्थान निवडणुकीच्या मैदानात

एमआयएम मध्य प्रदेश व राजस्थान निवडणुकीच्या मैदानात

ब-हानपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक नफीस मन्शा खान तर एससी आरक्षित जबलपूर येथील जागेवर गजेंद्र सोनकर यांना उमेदवारी.‌‌..खासदार इम्तियाज जलील यांनी दिले एबी फाॅर्म

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीत प्रचार जोरात सुरू आहे. मध्य प्रदेश राज्य विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. ब-हानपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक नफीस मन्शा खान तर जबलपूर विधानसभा एससी आरक्षित जागेवर गजेंद्र सोनकर यांना उमेदवारी दिली आहे. तर राजस्थान विधानसभा मतदारसंघातून तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत. तेलंगणा राज्यात एमआयएम व बिआरएसची सत्ता येणार असल्याचा विश्वास पत्रकार परिषदेत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली. मध्य प्रदेश विधानसभेत 230 जागा आहे. अनेक जागा अशा आहे तेथे 30 ते 50 जागांवर मुस्लिम मतांचे वर्चस्व असताना काँग्रेसने फक्त दोन जागेवर मुस्लिम उमेदवार दिले असल्याने मुस्लिम समाजात नाराजी आहे. मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला जात आहे त्यांचे प्रश्न सोडवले जात नाही तर त्यांना निवडणुकीत हिस्सेदारी मिळत नाही म्हणून दोन जागेवर उमेदवार निश्चित केले आणखी उमेदवार ऐनवेळी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेश राज्यात काँग्रेसच्या जागेसमोर एमआयएम उमेदवार देणार नसल्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow