रेल्वे अपघात घडल्यास प्रवाशांचा जीव कसा वाचवावा, पुर्णा स्टेशनवर माॅक ड्रील यशस्वी

 0
रेल्वे अपघात घडल्यास प्रवाशांचा जीव कसा वाचवावा, पुर्णा स्टेशनवर माॅक ड्रील यशस्वी

रेल्वे अपघात घडल्यास प्रवाशांचा जीव कसा वाचवावा, पुर्णा स्टेशनवर माॅक ड्रील यशस्वी....                                                                            

 पूर्णा स्टेशनवर नांदेड रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांची संयुक्त मॉक एक्सरसाइज सफल 

नांदेड,दि.30(डि-24 न्यूज) पूर्णा स्टेशनवर नांदेड रेल्वे विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांसह (प्रशासन, पोलिस, आरोग्य आणि अग्निशमन) संयुक्त मॉक एक्सरसाइज आयोजित करण्यात आली होती. हि मॉक ड्रील सफल झाल्याचे श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी कळविले आहे. 

या संदर्भात, दिनांक 29.04.2024 रोजी पूर्णा रेल्वे स्टेशनवर सर्व संबंधित विभागांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आज च्या मॉक ड्रील ची रूपरेषा ठरविण्यात आली होती. 

त्यानुसार आज , दिनांक 30.04.2024 रोजी सकाळी 09.36 मिनिटांनी हि मॉक ड्रील सुरु करण्यात आली. या ड्रील नुसार एक रेल्वे गाडीला अपघात होवून यात एका डब्यास आग लागल्याचे, एक डब्बा घसरल्याचे तर एक डब्बा दुसऱ्या डब्यावर चढल्याचे प्रातेक्षिक तयार करण्यात आले होते. नांदेड विभागाच्या नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांकडून संदेश देण्यात आला. आणी बचावकार्य सुरू करण्यात आले. मदत कक्ष स्थापन कण्यात आले. तसेच हेल्प लाईन नंबर ची माहिती मिडिया ला देण्यात आली. बचाव कार्य सुरु करण्यात आल्याचे कळविण्यात आले. 

या मध्ये सर्व प्रथम एका डब्ब्यास लागलेली आज विझविण्याची ड्रील सुरु करण्यात आली . या डब्यास लागलेली आग पूर्णा अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या टीम ने हि आग विझविली. आग विझवण्यासाठी रेल्वे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर केला. रेल्वे रुग्णवाहिकाही लवकरच घटनास्थळी पोहोचल्या. रेल्वेच्या आरपीएफ,स्काऊट गाईड टिमने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश करून आग पूर्णपणे विझवली. डब्बाचे पत्रे कापून,खिडकी तोडून सर्व प्रवाशांना तासाभराच्या आत बाहेर काढण्याची कवायत करण्यात आली. 

त्या नंतर घसरलेल्या डब्यामधील आणि चढलेल्या डब्यामधील प्रवाशांना कटर च्या सहायाने डब्बे कापून बाहेर काढण्यात आले.  

या ड्रील मध्ये आठ प्रवाशी जखमी झाल्याचे आणि एक प्रवाशी दगावल्याचे दाखविण्यात आले. यावेळी जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केल्याचे दाखवण्यात आले. या प्रवाशांना अम्बुलंस मधून सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. 

दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम कडून नियमित पणे संयुक्त मॉकड्रील करण्यात येते. यावर्षी पूर्णा लोकोशेड परिसरात हे ड्रील मंगळवारी ३० रोजी सकाळी करण्यात आले.या मॉकड्रिलमधून (Mock drill) मोठी दुर्घटना घडल्यास विविध टीमसोबत सतर्कता आणि प्रतिसाद किती वेळेत मिळतो. याच पार्श्वभूमीवर कवायती घेण्यात आल्या. 

दरम्यान राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF), रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला आणि सर्व संबंधितांना संदेश देण्यात आला. राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF) काही वेळातच या यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळी जाऊन तात्काळ नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. 

यावेळी जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केल्याचे दाखवण्यात आले. 

सर्व स्टेकहोल्डर्स प्रतिसादात्मक आणि जलद असल्याचे आढळले आणि संपूर्ण परिस्थिती 1 तासात नियंत्रित करण्यात आली. या कवायतीमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत झाले आणि वास्तविक जीवनात अशा प्रात्यक्षिकाची मोठ्या प्रमाणात मदत होईल. नांदेड विभागाचे उद्दिष्ट शून्य अपघात आणि अशी कोणतीही घटना घडल्यास त्वरित प्रतिसाद देण्याचे आहे. अपघाताची पूर्वतयारी आणि जलद प्रतिसाद यासाठी या कवायती रेल्वेद्वारे संयुक्तपणे केल्या जातील. द.म.रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सुरक्षा विभागाने या कवायतीचे संयोजन केले. 

यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रिन्सीपल चिफ सेफ्टी अधिकारी श्री व्यंकटराम रेड्डी , नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती निती सरकार अप्पर व्यवस्थापक श्री राजेंद्र कुमार मिना, एन.डी.आर.एफ विभागाचे कमांडिंग अधिकारी इन्स्पेक्टर श्री प्रमोद राय, श्री राहुल रघुवंशी, सुरक्षा अधिकारी, एन.डी.आर.एफ रेल्वे मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. नारायणा स्वामी, रेल्वे विभागीय सुरक्षा विभाग प्रमुख हरिकृष्ण, डॉ. विजय कृष्णा, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी, श्री जितेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अधिकारी, श्री हेमा नाईक, वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिकल इंजिनियर, डॉ, किशोर, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी , पोलीस अधिकारी , परभणी, अग्निशामक दल अधिकारी , परभणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या ड्रील नंतर श्रीमती नीति सरकार विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांनी सांगितले कि हि ड्रील सफल झाली आहे. या ड्रील मध्ये आम्हाला अशा अपवादात्मक परिस्थितीत रेल्वे ची तयारी कशी आहे याची प्राथमिक माहिती घेता आली, तसेच जिल्हा प्रशासन चीही मदत घेवून कशा प्रकारे प्रवाशांना अशा अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी हानी पोहोचेल यासाठी काय करावे याची हि माहिती घेण्यास मदत झाली असल्याचे कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow