आरेफ नसिम खान व अझहरोद्दीन यांना पाडणा-यांना धडा शिकवू - अफसरखान

 0
आरेफ नसिम खान व अझहरोद्दीन यांना पाडणा-यांना धडा शिकवू - अफसरखान

आरेफ नसिम खान, अझहरोद्दीन यांना पाडणा-यांना धडा शिकवू - अफसरखान

बुढीलेनच्या जाहीर सभेत अफसरखान व जावेद कुरैशी यांचा एमआयएम वर घनाघात

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) मुंबईत माजीमंत्री आरेफ नसिम खान, माजीमंत्री बाबा सिद्दिकी, फरहान आझमी यांच्यासमोर मुस्लिम उमेदवार देऊन एमआयएमने निवडणुकीत पाडले. बिहार, उत्तर प्रदेश राज्यात पण असेच केले. मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचित सोबत आघाडी करुन खासदार झाले त्यानंतर विधानसभेत वंचितची वेळ आली तर युती तोडली. यांचे छुपे एजंडे जनतेसमोर आणणार व या निवडणुकीत धडा शिकवणार असा हल्लाबोल बुढीलेन येथील जाहीर सभेत वंचितचे उमेदवार तथा नेते अफसरखान यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले मतदारसंघातून अफवा केली जात आहे मुस्लिम उमेदवार एमआयएम विरोधात उभे करून हरवण्यासाठी उभे आहे त्यांना माझा प्रश्न आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शंभर सिट उभे करुन दिग्गज मुस्लिम नेत्यांना पाडल्याने तेथे योगी सरकार पुन्हा सत्तेत आले. ते जेव्हा मुस्लिम नेत्यांना पाडण्यासाठी उभे राहतात त्यांचे ते खरे आहे आम्ही उभे राहिलो तर प्रश्न उपस्थित करतात. मी हरवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी उभा आहे मला दलित मुस्लिम व अन्य समाजाचा मला प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिमांवर जेव्हा कठीण वेळ आली तर ते कोणत्या बिळात लपून बसतात ते सांगावे. 

शहरात काॅर्नर मिटींगलाही गर्दी होत आहे. अशी टिका अफसरखान यांनी केली. 

यावेळी ओटी पसरवून अफसरखान यांनी यावेळी मते मागितली.

तुम्ही शिवाजी महाराज यांचे मावळे आहेत तुम्हाला औरंगजेब रह. यांच्याशी काही देणेघेणे नाही. परंतु ते आमचे पिर मुर्शद आहे. ऐतिहासिक औरंगाबादचा इतिहास त्यांना माहीत आहे का. हिंदूंची मते घेण्यासाठी ते असले वक्तव्य करत असल्याची टिका जावेद कुरैशी यांनी केली. 

यावेळी माजी नगरसेवक सय्यद मतीन यांनी वंचित मध्ये प्रवेश केला.

यावेळी वंचितचे महीला आघाडीचे प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी अरुंधती सिरसाठ, स्टार प्रचारक अमित भुईगळ, माजी नगरसेवक कृष्णा बनकर, श्याम भारसाखळे यांचे भाषण झाले. 

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष योगेश बन, एड पंकज बनसोडे, अफसर पठाण, मतीन पटेल, मुजीब खान, जुनैद सिद्दीकी, असीम खान, शेख तौफिक, अश्रफ खान, अयफाज खान, फेरोज खान उपस्थि

त होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow