महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ मंत्री अतुल सावे यांनी काढली पदयात्रा
 
                                महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ मंत्री श्री अतुल सावे यांनी काढली पदयात्रा...
भाजप सोबत घटक पक्षाचा यात्रेत सहभाग...
मंत्री श्री अतुल सावे, डॉ.भागवत कराड यांची उपस्थिती...
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पूर्व मतदार संघाचे आमदार श्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ पूर्व मतदार संघात शक्तिप्रदर्शन करत पदयात्रा काढण्यात आली. लोकसभे साठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित दादा गट) मनसे, रीपाई (आ) रासप, तसेच इतर घटक पक्षाच्या वतीने जोरदार घोषणा बाजी करत, तसेच शक्ती प्रदर्शन करत पूर्व मतदार संघातील गारखेडा परिसरा मधील जय भवानी नगर येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, राजेंद्र जंजाळ, सुमित खांबेकर, लक्ष्मीकांत थेटे, बालाजी मुंडे, मनिषा मुंडे वाघ, विवेक राठोड, नितीन खरात, रामचंद्र जाधव, यांच्या सह मोठ्या संख्येने विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक यांची उपस्थि
 
 
ती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            