आव्हाडांच्या विरोधात लिंगायत समाजाने केले आंदोलन
आव्हाडांच्या विरोधात लिंगायत समाजाने केले आंदोलन
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) लिंगायत वीरशैव समाजाचे जनक महात्मा बसवेश्वर यांनी आत्महत्या केली असे विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने लिंगायत समाज संतप्त झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी क्रांतीचौकात लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने जोडेमारो आंदोलन करत निषेध केला.
देशभरातील आठ कोटी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महापुरुषांच्या विरोधात असे विधान करणाऱ्या राजकीय नेत्या़वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शिवा खांडखुळे, कार्याध्यक्ष राजेश कोठाळे यांनी केले.
याप्रसंगी मराठवाडा अध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा खर्डे, नंदकिशोर गवंडर, प्रभाकर आप्पा गवंडर, शिवानंद मोधे, संतोष लिंभारे, शिवानंद वाडकर, गणेश कोठाळे, गणेश संगेकर, रुद्र आप्पा कोठाळे, चंद्रशेखर कोठाळे, दत्ता ज्ञाने, उत्तम कोठाळे, पगणिक मेणे, संतोष कोठाळे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?