हिंदूत्वासाठी नागरीकांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभे राहावे - मंत्री अतुल सावे

 0
हिंदूत्वासाठी नागरीकांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभे राहावे - मंत्री अतुल सावे

हिंदूत्वासाठी नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभे रहावे - मंत्री श्री अतुल सावे

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज ) राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पूर्व मतदार संघाचे आमदार श्री अतुल सावे यांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळत पदयात्रेच्या माध्यमांतून नागरिकांना पत्रक वाटली.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान हे 13 तारखेला घेण्यात येणार आहे. यासाठी महायुतीच्या घटक पक्षा कडून जिल्हा भर ठीक ठिकाणी जोरदार प्रचार करण्यात येत आहे. अशात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी गुरुवारी मंत्री श्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत गारखेडा परिसरातील भारत नगर वार्ड मध्ये भव्य पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी घरोघरी जावून नागरिकांना पत्रके वाटप करत हिंत्वासाठी आपण नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभे रहावे तसेच केंद्रात त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या धनुष्यबाण या चिन्ह समोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले.

या यात्रेची सुरुवात सावित्रीबाई फुले चौक मधून करण्यात आली असून ही पदयात्रा पुढे मार्गस्थ होत विश्वकर्मा मंगल कार्यालय, गायकवाड दवाखाना, स्वामी समर्थ नगर,अमोल तांबे, विश्वकर्मा चौक, वेदवाडा, दुर्गा माता मंदिर, दत्ता शिंदे, नवनाथ मंदिर,नर्मदा शाळा, गल्ली नंबर 12, भिकन राऊत, दिलीप जोगदंड, संकट मोचन हनुमान मंदिर, आनंद नगर रोड, बलवान चिंडालिया, गल्ली नंबर 7, विवेक राठोड, तुळजा भवानी चौक, साई मंदिर, आनंद नगर, रेणुका नगर, मीना ताई पवार, सागर प्रसाद, भोकरे मामा, भगवान वाघ, दशरथ आटोळे, शोभा ताई, रेणुका नगर हनुमान मंदिर, ठेंगडे पाटील गल्ली, आप्पा कुटेकर, संजय पाटील यांची गल्ली येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. 

या प्रसंगी आमदार प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ,शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेठे, विवेक राठोड, नितीन खरात, राम दसपुते, अशोक गोरे, कृष्णा निकोळे, मनीषा मुंडे वाघ, शालिनी बुंदे, सुवर्णा धानोरकर, गीता कापूरे, आरती गुटालकर यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सिडको परिसरातील माया नगर, ठाकरे नगर भागातील सुधीर वराडे, ठाकरे नगर बी सेक्टर मधील विठ्ठल रुखमनी मंदिर, स्वामी समर्थ केंद्र सिडको एन 2, विनय कॉलनी गणेश मंदिर, याठिकाणी कॉर्नर बैठक घेण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow