एका महीन्यात आगीच्या दुसऱ्या घटनेने हादरले शहर, तीन वर्षांची चिमुकली दगावली...?

 0
एका महीन्यात आगीच्या दुसऱ्या घटनेने हादरले शहर, तीन वर्षांची चिमुकली दगावली...?

किराडपूरा येथे आगीच्या घटनेत तीन वर्षांची मुलगी दगावली...?, आग आटोक्यात

एका महीन्यात आगीच्या दोन घटना, 3 एप्रिलला छावणीत आगीची घटना घडली होती त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता आज 3 मे आहे एका महीन्यात दोन घटना, तेच अरुंद रस्ते, अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी रस्ता नसल्याने बचावकार्यात बाधा येत होती, यामुळे स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात प्रयत्न केल्याने काही लोकांचा जीव वाचला.... परिसरातील विजपुरवठा बंद करून केले बचावकार्य ... घटनास्थळी डिसिपि नवनीत कावत यांनी भेट दिली.

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) आज रात्री 8 ते 8.30 वाजेच्या दरम्यान किराडपूरा, रोशन मस्जिदच्या पाच फुटांच्या गल्लीतील घरात प्रत्यक्षदर्शींना घरेलू गॅस सिलिंडर विस्फोटाचा आवाज आला. या आवाजामुळे परिसरातील लोकांनी त्या घराकडे धाव घेतली. आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी रेती, पाण्याचा मारा केला. आग आटोक्यात येत नव्हती. काही लोकांना घराबाहेर काढले. भंगार विक्रेता शेख रिझवान पठाण, वय 32, जखमी यांचे हे घर आहे या घरात दोन कुटुंबे राहतात. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी शंभर ते दोनशे फुट पाईप घेऊन जावे लागले. अरुंद रस्ता असल्याने बचावकार्यात बाधा येत होती. शेजा-यांनी काही लोकांना घराबाहेर काढले. रिझवान खान बचावकार्य करत असताना दोन्ही हात जळाले. वेळेवर एम्बूलन्स मिळाले नसल्याने पायी जात किराडपूरा स्टाफ पर्यंत आणले. अगोदर जखमींना दुवा फाऊंडेशनच्या एम्बूलन्सने जखमींना घाटीत दाखल केले. एम्बूलन्स उपलब्ध झाली नसल्याने रिझवानला ऑटो मध्ये बसवून घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे व जिन्सी पोलिस व पोलीस कर्मचारी, मनपाचे बचाव पथक कार्यरत होते.

प्रत्यक्षदर्शीनी सांगितले एका तीन वर्षांच्या मुलीची या घटनेत मृत्यू झाल्याचे सांगितले. पाच जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले चौकशी केल्यानंतर आगीचे कारण समोर येईल या घटनेत कीती लोकांचा मृत्यू झाला याची त्यांनी पुष्टी केली नाही. यावेळी माजी नगरसेवक अफसरखान, हाजी इसाक खान, जमील अहमद खान व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमींमध्ये रिझवान सत्तारखान पठाण, वय 50, राहणार किराडपूरा, औरंगाबाद, 20 टक्के बर्न, फैजान रिझवान पठाण, वय 13, एक टक्के बर्न, रेहान चांद शेख, वय 16, दहा टक्के बर्न,सध्या रुग्णालयात, जिशान शेख, वय 17, 40 टक्के बर्न, आदील शेख, वय दहा, एक टक्के बर्न सदफ इरफान शेख, वय 3 मयत झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे. जखमींवर वार्ड 22 आणि 23 मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने शहर हादरले हळहळ व्यक्त होत आ

हे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow