सुरेवाडीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या पदयात्रेस प्रतिसाद

 0
सुरेवाडीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या पदयात्रेस प्रतिसाद

सुरेवाडीत एकच मामा...भूमरे मामा...चा जयजयकार

शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी

पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज )मध्य मतदार संघाचे आमदार प्रदीप यांच्या नेतृत्वात सुरेवाडी येथे लोकसभा मतदार संघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेन्द्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत यांनी सहभाग नोंदवून धनुष्य बाणाला मतदान करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या पदयात्रेत फिर एक बार... मोदी सरकार...अब की बार...चारसो पार...

एकच मामा... भूमरे मामा...भारत माता की जय...भारत का नेता कैसा हो... नरेंद मोदी जैसा हो.. अशा घोषणा देण्यात आल्या. भारत नगरची प्रत्येक गल्ली भूमरे साहेब तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ हैं.. च्या घोषणांनी दणाणून गेली. ठीक ठिकाणी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइं (आठवले गट), रासपा, पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट), प्रहार संघटना महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांचे भारत नगरातील महिलांनी औक्षण केले. चौकाचौकात श्री भूमरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी धनुष्य बाणाला बहुसंख्य मतांनी निवडूण देण्याचे आवाहन केले. या प्रचार रॅलीत महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह भारत नगरातील नागरिकांची मोठ्या संख्येने सहभाग होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow