ओबीसींच्या मेळाव्यात संदीपान भुमरे यांना निवडून आणण्याचा निर्धार
7800 कोटींच्या तरतूदिने ओबीसींचा सर्वांगीण विकास होईल
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा विश्वास
ओबीसींच्या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांना निवडूण आणण्याचा निर्धार
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) राज्यभरात ओबीसी समाज बहुसंख्य आहे. बहुतांश लोकांची परिस्थिती वाईट आहे. त्यांच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबध्द आहे. ओबीसी समाजाने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, औद्योगिक प्रगती साधावी. यासाठी सुरुवातीला 381 कोटी रुपयांचा खर्च होता. तो आता 7800 कोटी रुपये करण्यात आला आहे. यामुळे या समाजाची प्रगती झपाट्याने होईल, असा विश्वास बहुजन कल्याण मंत्री तथा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी भानुदास राव चव्हाण सभागृहात आयोजित ओबीसी मेळाव्यात शनिवारी (दि. ४) व्यक्त केला.
शहरातील भानुदासराव चव्हाण सभागृहात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ भानुदासराव चव्हाण सभागृहात ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस भगवान बापू घडामोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय जोरले, कचरू घोडके, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, दीपक ढाकणे, ओबीसी महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष पूजा सोनवणे,शहर सरचिटणीस भारती कुंभार, शहर सरचिटणीस संगीता जैस्ववाल, शहर सरचिटणीस नीता दाभाडे, शहर उपाध्यक्ष छाया नागवंशी, शहर उपाध्यक्ष प्रवीणा अन्नदाते, शहर उपाध्यक्ष मनीषा बुटे, शहर उपाध्यक्ष राधा इंगळे, बेबी जैन, शहर सचिव मंजुषा वाघमारे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गृह निर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले, की आमच्या सरकारने ओबीसींना न्याय देण्याचे काम केले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचे काम केले. माझ्या खात्यामार्फत वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 24 हजार घरकुलाना मंजुरी देण्यात आली. मोदी आवास योजनेअंतर्गत 3 वर्षात 3 लाख घर देण्यात येणार आहे. राज्यभरातील ओबीसी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक हितासाठी उघडण्यात आलेल्या आश्रम शाळा दर्जेदार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं त्यासाठी टॅबची सोय केली. 20 हजार टॅब वाटले. 141 शालात त्यांना 2 - शिक्षक मिळवून दिले. धनगर समाजातील मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षणासाठी 70 हजार रुपये आम्ही खर्च करतोय. राज्यात 72 तर जिल्ह्यात 2 हॉस्टेल बांधत आहोत. 100 मुल आणि 100 मुली यात राहतील. महा ज्योतीच्या माध्यमातून 10 कमर्शियल पायलट तयार झालेत.
ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने केले. त्यांच्या पाठीमागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी भूमरे यांना निवडून द्यावे. 2019 मध्ये मी राज्यमंत्री झालो. 1680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा मंजूर करून आणली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यांनी दोन वर्षात 1 रुपया दिला नाही. आपले सरकार आले आणि 200 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनासाठी दिले. आता सर्व कामे चालू आहे. ही योजना लवकरच पूर्ण होईल. महापालिकेची खस्ताहालत असल्यामुळे महापालिकेचा वाटा सरकारने उचलावा यासाठी 800 कोटी रुपये मंजूर करून घेतले. राज्यात आपले सरकार आहे. केंद्रातही आपले सरकार आहे. केंद्रातील विहिरीचे पाणी आण्याचे असेल तर ती पाईप लाईन महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आहे. त्यांना दिल्लीत पाठवा. येत्या १३ तारखेला धनुष्य बाणाला मतदान करून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन केले. तत्पूर्वी माजी राज्य मंत्री गंगाधर गाढे यांचे आज शनिवारी भल्या पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस बापू घडमोडे म्हणाले, की विरोधी पक्षाकडे विकासाचे मुद्दे नाहीत. तुमचे आरक्षण आमच्या कार्यकाळात टिकले, असा प्रचार ते करत आहे. ओबीसीचे आरक्षण घालण्याचे काम विरोधकांनी केले. भूमरेंना केलेले मतदान मोदी यांना जाणार आहे. ही निवडणूक देशाच्या सीमा बळकट करण्यासाठी आहे. आपली लढाई एमआयएमशी आहे. इतरांना मत देणं म्हणजे आपला घात करून घेणे आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले, की अफवांना बळी न पडता येत्या 13 तारखेला शिवसेनेला मतदान करायचे आहे. ओबीसी मोरच्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुर्ण ताकद लावून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना निवडून आणायचे आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा नक्षत्रवाडी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. मत पेट्यातून
आपणच उमेदवार समजून काम करावं- महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे
आपल नशीब चांगले आहे आपल्याला सावे भेटले. त्यांनी केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा मी साक्षीदार आहे. ओबीसींच्या खात्याला आम्ही बजेट वाढून घेण्याचे काम केले. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केले. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी नेहमी तत्पर राहील. यासाठीच आपण स्वतःला उमेदवार समजून घराघरापर्यंत धनुष्य बाण पोहोचवा आणि मला या शहराची सेवा करण्याची संधी द्या. समोरच्या उमेदवाराने 20 वर्ष सत्ता उपभोगली. पाण्याचा विषय निघाला तर खैरेंचे नाव निघते. त्यांनी समांतरचे वाटोळे केले. महानगर पालिकेचा वाटा शासनाने उचलावा याची आम्ही विनंती केली. ती मान्य केली. पैठणचे पाणी 24 तास शहराला पुरेल याचे नियोजन करायचे आहे. खैरे साहेबांकडे कुठलेही व्हिजन नाही. आम्हाला एकाच व्यासपीठावर आणा. आणि कोणी किती कामे केली हे जाहीर करावं. माझ्या खात्या अंतर्गत विहीर, गोठे, रस्ते, पेव्हर ब्लॉक्स दिले. विहिरी, शेततळे, गोठे आणि फळबागा संदर्भातील असलेल्या जाचक अटी काढल्या. यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा झाला. खरे यांच्याकडे गृहनिर्माण, परिवहन खाते होते. त्यांनी एकतरी बस स्टँड बांधले का? 25 वर्ष शहराचे वाटोळे करणाऱ्यांचा अनुभव घेतला. आता मला संधी द्या. मी काही फार हुशार नाही... पण काम करण्या
ची बुद्धी आहे.
What's Your Reaction?