सहकारी संस्थांची अद्ययावत माहिती मागविली

 0
सहकारी संस्थांची अद्ययावत माहिती मागविली

सहकारी संस्थांची अद्यावत माहिती मागविली...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज)- ‘राष्ट्रीय सहकारी डेटाबेस’ करीता सहकारी संस्थांची अद्यावत माहिती मागविण्यात आली असून तालुक्यातील सहकारी संस्थांनी आपली अद्यावत माहिती उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे पाठवावी असे आवाहन तालुका उपनिबंधक श्रीमती सुरेखा फुपाटे यांनी केले आहे.

 राष्ट्रीय सहकारी डेटाबेस च्या संकेतस्थळावर सन २०२३ च्या परिशिष्ट अ नुसार माहिती भरण्यात आली आहे. तथापि, सहकारी संस्थांचे अद्यावत ई मेल पत्ता, अध्यक्ष व सचिव यांचे भ्रमणध्वनी क्रमांक, संस्थेतील सभासद संख्या, महिला, अनु.जाती, जमाती सभासद यांची माहिती इ. या संकेतस्थळावर अद्यावत कराव्या अशा सुचना आहेत. तरी तालुक्यातील नोंदणीकृत सहकारी संस्थांनी अद्यावत माहिती उपनिबंधक सहकारी संस्था तालुका छत्रपती संभाजीनगर यांचा ईमेल dres.aurangabad@gmail.com वर संस्थेच्या नावासह पाठवावी जेणे करुन ही माहिती संकेतस्थळावर अद्यावत करता येईल,असे आवाहन श्रीमती फुपाटे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow