रांजणगाव येथील युवकाच्या हत्या प्रकरणातील सुत्रधार आतापर्यंत मोकाट, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

रांजणगाव येथील युवकाच्या हत्या प्रकरणातील सुत्रधार आतापर्यंत मोकाट, पोलिस आयुक्तांना दिले निवेदन...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.25(डि-24 न्यूज)
रांजनगाव येथील तरुण कपिल पिंगळे याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्यामागील मुख्य सूत्रधार अटक न झाल्यामुळे आज पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) च्या वतीने निवेदन देण्यात आले. आयुक्तांसोबत या प्रकरणी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळेस संबंधित गुन्ह्याचा तपास क्राईम ACP व DCP यांच्याकडे सोपविण्यात आला. या हत्येमागिल सूत्रधार लवकरात लवकर पकडण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिला. यावेळेस चर्चा करताना रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, कार्याध्यक्ष शरद कीर्तिकार, जिल्हा सचिव विशाल सोनवणे, अमोल भालेराव, काकासाहेब कोळसे, मनोज कसारे, सुमित भटकर, नितीन सुर्यवंशी, सुभाष मानवतकर, सुदाम पिंगळे ,कपिल पिंगळेचे आई वडील व नातेवाईक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होते.
What's Your Reaction?






