रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने मनपाच्या वतीने 35 हजार दंड वसूल

 0
रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने मनपाच्या वतीने 35 हजार दंड वसूल

दोन नागरिकांकडून ३५०००/- दंड वसूल

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.25(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या मालमत्ता धारक यांचेवर सातत्याने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

 झोन क्र 5 अंतर्गत कॅनाॅट प्लेस येथील बी.एस.एन.एल ऑफिस समोर सुरू असलेल्या बांधकाम 

ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्याने संबंधित सिद्धी विनायक प्रॉपर्टी नागरिकास २५०००/- दंड करण्यात आला. एन ०७ सिडको येथे जिगिशा स्कूलच्या बाजूला सुरू असलेले बांधकाम मालमत्ता धारक डॉ. खर्चे यांचे वर रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्या बाबत रु.१५०००/- रु दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई उप आयुक्त तथा सहायक आयुक्त झोन क्रं ०५ सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक रेणुका गायकवाड स्वच्छता निरीक्षक सुरज भंडारी, हरीश मिसाळ, रेड्डी झोनल दिनेश बियाणी तसेच मित्र नागरिक पथक ज्ञानेश्वर पाटील व किशोर भागवत यांनी पार पाडली

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow