मांजा पासून दुचाकी चालक सुरक्षा अनुषंगाने वाहतूक पोलिसांचा उपक्रम

 0
मांजा पासून दुचाकी चालक सुरक्षा अनुषंगाने वाहतूक पोलिसांचा उपक्रम

मांजा पासून दुचाकी चालक सुरक्षा अनुषंगाने उपक्रम

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)

दोन चाकी वाहन चालवताना नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुखापती अनुषंगाने शहर वाहतूक शाखा दोन चे सर्व रायडर अंमलदार व रेल्वे स्टेशन हद्दीतील दुचाकी चालक यांच्या सुरक्षा अनुषंगाने दुचाकी वाहनासाठी प्रायोगिक तत्वावर 50 वाहनांना दुचाकी संरक्षक कवच बसवले असून ज्यामुळे नायलॉन मांजा चालकापर्यंत पोहोचू शकत नाही. व चालकाला दुखापत होणार नाही.

सदर योजनेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार , पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विवेक गणपत जाधव, सोबत सफौ अशोक कदम, पोह मनोहर पाटील, राजू मेहर, शामशोद्दीन कादरी, भगवान जगताप, संतोश काकडे, भरतसिंग दुलत समाज सेवक मुसा खान यांनी विशेष सहकार्य केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow